तुर्कीस्तान आणि सीरियामध्ये वारंवार भूकंप का होतात ? वाचा सविस्तर माहिती..
सोमवारी, 6 फेब्रुवारी 2023 रोजी पहाटे 4:15 वाजता तुर्कीमध्ये 7.8 तीव्रतेचा विनाशकारी भूकंप झाला. तुर्कस्तान आणि सीरिया सीमेजवळ दक्षिण मध्य तुर्कीला भूकंपाचा धक्का बसला आणि त्यानंतर केवळ 11 मिनिटांनी 6.7 तीव्रतेचा आफ्टरशॉक आला. 300 हून अधिक आफ्टरशॉक तुर्कीला हादरले, त्यापैकी सर्वात मोठा भूकंप 7.5 तीव्रतेचा होता.
अदानी समूहावर एकूण 2 लाख कोटी रुपयांचे कर्ज; जाणून घ्या अदानीला कोणत्या बँकांनी किती कर्ज दिले !
युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, तुर्कस्तानला आलेला विनाशकारी भूकंप केवळ त्याच्या प्रचंड तीव्रतेमुळेच नाही तर त्यापूर्वीच्या घटना पूर्व अॅनाटोलियन फॉल्ट सिस्टीममध्ये झाल्यामुळे देखील अद्वितीय आहे, जेथे पूर्वी मोठे भूकंप झाले नाहीत. याआधी, तुर्कस्तानमध्ये बहुतेक मोठे भूकंप नॉर्थ अनाटोलियन फॉल्ट सिस्टमच्या बाजूने झाले. भूकंपाच्या वेळी ज्या पृष्ठभागावर पृथ्वीचे दोन खंड अचानक एकमेकांवर आदळतात त्याला फॉल्ट किंवा फॉल्ट प्लेन म्हणतात. मात्र तुर्कीमध्ये भूकंप होण्यामागे कारण काय आहेत तसेच आतापर्यंत किती भूकंप झाले.. याचा थोडक्यात आढावा..
तुर्कीमध्ये वारंवार भूकंप का होतात ?
तुर्कस्तानमधील आपत्ती आणि आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणानुसार २०२० मध्येच या देशात जवळपास ३३ हजार भूकंपांची नोंद झाली आहे. त्यापैकी ३३२ भूकंप ४.० आणि त्याहून अधिक तीव्रतेचे होते. हा प्रदेश भूकंपप्रवण भूस्तरांच्या मोठय़ा प्रभंग रेषांच्या वर (फॉल्ट लाइन्स) वसलेला आहे. त्यामुळे येथे वारंवार भूकंप होतात. तुर्कस्तान, सीरिया अगदी इराणपर्यंतच्या प्रदेशात दरवर्षी कमी-जास्त तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसतात. तुर्कस्तानची भूकंपप्रवण स्थिती त्याच्या टेक्टोनिक स्थानावरून समजते. पृथ्वीच्या सर्वात बाहेरील थरामध्ये सुमारे १५ प्रमुख स्लॅब असतात. ज्यांना टेक्टोनिक प्लेट्स म्हणतात. या प्लेट्समधील सीमांमध्ये अचानक झालेल्या कोणत्याही हालचालींमुळे भूकंप होऊ शकतो.
तुर्कस्तान अनाटोलियन टोक्टोनिक प्लेटवर स्थित आहे. तुर्कस्तानच्या उत्तरेला युरेशियन प्लेट आहे. युरेशियन आणि अॅनाटोलियन टेक्टोनिक प्लेट्स मीलनिबदू हा विशेषत: विनाशकारी म्हणून ओळखला जातो. या प्लेट्समध्ये वारंवर घर्षण होत असल्याने येथे भूकंप होतात. ही जगातील सर्वात कमकुवत फॉल्ट लाइन्स असल्याने हा प्रदेश भूकंपप्रवण आहे. काही भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते तुर्कस्तानमधील जवळपास ९५ टक्के भूभागाला भूकंपाचा धोका आहे, तर इस्तंबूल आणि इझमीर या प्रमुख शहरांच्या आसपासचा भाग आणि पूर्व अनातोलियाच्या प्रदेशासह देशाच्या सुमारे एकतृतीयांश भागाला जास्त धोका आहे.
टेक्टोनिक प्लेट्स म्हणजे काय?
पृथ्वीमध्ये आतील गाभा, बाह्य गाभा, आवरण आणि कवच असे चार प्रमुख स्तर आहेत. कवच आणि आवरणाचा वरचा भाग पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक पातळ त्वचा बनवतो. पृथ्वीचा सर्वात बाहेरचा थर, ज्याला लिथोस्फियर देखील म्हणतात, कवच (खंडीय आणि महासागर) आणि आवरणाचा वरचा भाग बनलेला आहे आणि टेक्टोनिक प्लेट्स नावाच्या सुमारे 15 प्रमुख स्लॅबमध्ये विभागलेला आहे. टेक्टोनिक प्लेट्स लिथोस्फियर बनवतात आणि एकमेकांच्या सापेक्ष खूप हळू हलतात, विशेषत: दरवर्षी काही सेंटीमीटर. या हालचालींमुळे टेक्टोनिक प्लेट्सच्या कडांवर मोठ्या प्रमाणात विकृती निर्माण होते, ज्याला प्लेट बाउंडरीज म्हणतात आणि यामुळे भूकंप होतात.
तुर्कस्तानात आधी असे भूकंप झालेत का?
तुर्कस्तान, सीरिया या प्रदेशांत दरवर्षी अनेकदा भूकंपाचे धक्के बसतात. १९७० नंतर तुर्कस्तानात ६ रिश्टर स्केलपेक्षा अधिक तीव्रतेचे अनेक भूकंप झाले. १९३९ मध्ये ८.० तीव्रेतचा भूकंप झाला होता, त्यात ३३ हजार नागरिकांचा बळी गेला. १९७६ मध्ये ७.५ तीव्रतेच्या भूकंपात चार हजार जणांना मृत्यूला सामोरे जावे लागले, तर १९९९ मध्ये ७.६ तीव्रतेच्या भूकंपात १८ हजार जणांचा मृत्यू झाला.
#BREAKING#Turkey: More than 15000 people lost their lives after earthquakes in Turkey, Syria #TurkeySyriaEarthquake #Syria pic.twitter.com/qvUVcKybfx
— Asian Strategic Times (@AST_HQ) February 9, 2023
२०२० मध्ये चार वेगवेगळय़ा भूकंपांत १७० पेक्षा नागरिकांचा मृत्यू झाला. म्हणजेच १९३९ ते २०२३ या काळांत तुर्कस्तानने सहा मोठे भूकंप अनुभवले. १९०० पासून आतापर्यंत तब्बल ७६ भूकंपांमध्ये जवळपास एक लाखापर्यंत नागरिक भूकंपाचे बळी ठरले आहेत. त्यापैकी निम्म्या नागरिकांचा मृत्यू १९३९ आणि १९९९ मध्ये झालेल्या भूकंपात झाला. तुर्कस्तानचे भूकंपामुळे गेल्या शतकात २५ अब्जाहून अधिक अमेरिकी डॉलरचे नुकसान झाले आहे.