Take a fresh look at your lifestyle.
mahalokwani

शास्त्रीय व सुगम संगीत आणी बहुजन समाज-डॉ. बाळासाहेब पवार

0

डॉ. बाळासाहेब पवार
राजकीय व समाजिक क्षेत्रातील अभ्यासक

————————————-

महालोकवाणी न्यूज:-

bafana ad

लावणी व तमशाचा फड , शाहीरी डफ याचा वीर सर व शृंगार सर न समजताही अंगात ते जन्मजात भिनलेला बहुजन समाज भजन व भावगीतात रमतो पण त्याला त्यातील फार समजत अशातला भाग नाही . तमाशा त्यातील गण गवळण व वग त्याला आकर्षित करतो . तो तमाशात जसा रमतो तसाच भजनात , भारुडा त व देवीच्या गाण्यात व वाघ्या मुरुळीच्या गाण्यात म्हणजे जागरण गोंधळात पण तेव्हडाच रमतो त्याला ते आपलं जगणं वाटत लोक संगीत त्याला भावत तर भजन , भारूड, देवीची गाणी हा त्याच्या श्रद्धेचा भाग असतो ..
लोक संगीत हे त्याला आपले वाटते पण तो त्याला आश्रय देत नाही.


शास्त्रीय संगीत मात्र त्याला पचवायला जड जाते , तो त्या पासून फार दूर असल्याचे जाणवते , ती परंपरा त्याचीच असताना त्याला परकी वाटते तो तीला ऐकताना ही अभिजना ची परंपरा अश्याच दृष्टीने पाहतो . ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करत नाही . फार अत्यल्प लोकांना यात रस असतो त्यामुळे यात ही घराणे निर्माण झाली आहेत . अर्थात ही राग व गायकीची घराणे तर आहेतच .पण शस्त्रीय संगीत ठराविक लोकांच्या घरातच वाढत गेले हे मान्य करावे लागेल .

daily needs


आणखी एक मुद्दा म्हणजे शास्त्रीय गायनाच्या मैफिलीत जे भजन गायले जाते त्यात सर्वाधिक वारकरी भक्ती संप्रदायचे बहुजन संतांचे अभंग असतात . कोणताही शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम या अभंगा शिवाय होऊच शकत नाही . विविध राग , वेगवेगळ्या बंदिशी , ठुमरी, टप्पा किंवा आणखी काही गायन प्रकार समजत नसले तरी भजनाला मात्र बहुजन समाज दाद देतो . आपण भजन म्हणतोच , अभंग हा कीर्तनाचा महत्वाचे अंग असते . ते कीर्तनात गाण्याची पद्धत वेगळी आहे व शास्त्रीय संगिताचे पारंगत गायक तेच अभंग शास्त्रीय पद्धतीने गातात त्याचा बाज व साहित्य थोडे आधुनिक असते . बैठक वेगळी असते परंतु याचा केंद्र बिंदू महाराष्ट्राचा बहुजन महासमन्व्यक पांडुरंग च असतो . हे नेहमी जाणवते , पंढरपूरची महती सांगणारे अभंग असतात . संतांच्या रचना असतात . संत तुकारामांचे अभंग , नामदेवाचे अभंग,जनाबाई,चोखा मेळा, संत सावता यांच्याच रचना शास्त्रीय गायनाच्या मैफिलीत असतात . मग शास्त्रीय संगीत वेगळं काय असते. वेग वेगळे राग् आम्हाला समजत नाहीत ते खूप वेळ गायले जातात पण उपस्थित लोक योग्य वेळी दाद देतात.
बंदिश गायली जाते ती मुख्यता कृष्ण व राम यांच्याच सदर्भात असते . या बहुजन नायकांची महती सांगणारा हा संगीत प्रकार आहे अस न समजणाऱ्याला समजते जेव्हा त्यात कृष्ण व राम यांची नावे येतात एव्हडं तरी लक्षात येते . त्यामुळे शास्त्रीय संगीत हे आपले क्षेत्र नाही असा समज आज पण बहुजन समाजात आहे . त्यामुळे त्याला बहुजना चा अतिशय अल्प प्रतिसाद मिळतो . जो प्रेक्षक वर्ग सभागृहात असतो त्यात बहुतांश विशिष्ट वर्गाचे लोक असतात . खर तर त्यांचं कौतुक केल पाहिजे . हे हिंदुस्थानी संगीत त्यांनी पुढे नेहल आहे व आज ही तेच त्याचे प्रेक्षक आहेत . पण यात बहुजन समाजचा प्रेक्षक कुठे आहे .जर प्रेक्षक नसेल तर त्यातून गायक कसे निर्माण होणार .


शास्त्रीय गायन ही खरोखर साधना आहे . ती चालता चालता शिकण्याची गोस्ट नाही . ना ती पुस्तकातून शिकण्याची गोस्ट आहे . ही गुरु कडूनच प्रत्यक्ष शिकण्याची कला आहे . या साधनेत बहुजन समाज कमी पडतो . त्याला गुरु भेटणे व त्याने तेव्हडे कष्ट घेत साधना करणे हे आणखी त्याच्या गावी नाही .एक ,दोन किंवा आणखी काही परीक्षा पास होऊन अर्धवट संगित वर्ग चालवण्या पलीकडे तो काही करत नाही .
बहुजन नेहमी भक्त होतो ,तो सेवेकरी होत नाही . संगिताची सेवा व साधना केल्या शिवाय ते आत्मसात होणार नाही . त्याच्यात ते शिकण्याची क्षमता नाही . असे अजिबात नाही तो काहीही काढीन शिक्षण साध्य करू शकतो .पण प्रश्न मानसिकते चा आहे मला हे शिकायचं आहे . या क्षेत्रात नाव कमवायचं आहे अशी जिद्द असणारे मुले व पालक भेटत नाहीत . . पैसा मिळण्याचे ते साधन नाही अशी त्याची भावना आहे . परतू यात जर कष्ट घेतले तर खूप पैसा भेटतो . या क्षेत्रातील लोकांच्या तारखा वर्ष वर्ष मिळत नाहीत . कार्यक्रम ठेवणारा बहुजनच असतो खर्च करणारा तोच असतो प्रेक्षकात मात्र कमी असतो . गायन तर दूरची गोस्ट हे आपलं दुर्दैव आहे .


मंदिरे जसे बहुजन समाज वर्गणी करून बांधतो परंतु ताबा मात्र पुरोहिता कडे सोपवतो तसेच या बाबत झालेले जाणवते . गायल्या जाणाऱ्या रचना या बहुजन संतांच्या आहेत . गाणारा गायक मात्र बहुजन नाही .अर्थात कोण गातो या बद्दल आक्षेप अजिबात नाही .जो शिकणार कष्ट करणार तोच गाणार त्यात बहुमताची किंवा वशिल्याची गोस्ट थोडी आहे . प्रश्न गुणवत्तेचा आहेच . पण दुर्दैवाने गुणवत्ता असून ही त्या क्षेत्राला आपले क्षेत्र न मानने हे दुर्दैवी आहे . ते कुस्तीच्या फडात लंगोट लावत नाहीत मान्य आहे पण आपण ही शास्त्रीय सांगितात मुलांना पाठवत नाही हे पण खरे आहे .
गझल या प्रकारात भीमराव पांचाळे यांनी मराठी गझलेला वेगळी उंची मिळून् दिली सुरेश वैराळकर यांनी गझल ग्रामीण भागात पोहचवळी गझल कार शोधले मंचावर आणले महाराष्ट्र भर फिरवले . जमलं ते खेड्या पाड्यातील पोरांना ,मुली पण कमी नाहीत . अगदी कसदार गझल लिहितात व सादर करतात . आणखी खूप मोठा टप्पा गाठायचा आहे हे तितकेच वास्तव आहे.
शास्त्रीय गायनात ही असे व्हायला हवे आश्रय दाता समाज मात्र हि कला आत्मसात करायला कमी पडतो आहे ही खंत आहे . प्रथम त्याने ती आपली मानली पाहिजे तर त्यात त्याला यश मिळेल .
एक दुर्दैवी खंत म्हणजे आम्ही कला पण जातीच्या चौकटीत कोबून टाकल्या आहेत . तमाशा विशिष्ट लोकांनी करायचा . शास्त्रीय गायन विशिष्ट समाजानेच करायचे . वादक सुद्धा एक विशिष्ट जातीचा असणार . संगीताचे वेगवेगळे प्रकार वेगवेळ्या जातीत वाटलेले आहेत . लोकसंगीत वेगळ्यां च लोकांचे . आदिवसीचे नृत्य व गायन त्यांची वेगळी वाद्य आम्ही त्यांच्या कडून शिकलो नाही . शास्त्रीय संगीताला धर्म नाही देशाची सिमा नाही हे सर्वांचं आहे. आमच आहे.

. मुस्लिम धर्मीय गायन घराणी आहेत . वादक आहेत जे जागतील पातळीवर पोहचले आहे याची नोंद विसरून चालणार नाही. त्यात ही सुफी संगीत कव्वाली ही त्यांच्या पुरतीच मर्यादित ठेवली . आम्ही ती पण शिकत नाही . कव्वाली चा कार्यक्रम आम्हाला ऐकावा पण वाटत नाही त्याच्या कडे पूर्ण पाठ फिरवतो.

असे अनेक संगीत प्रकार आहेत ते ग्रामीण भागतील बहुजन माणसा पर्यंत पोहचलेच नाहीत . तो त्या कले पासून हजारो वर्ष दूरच राहिला . यातील सधन वर्ग या कडे मनोरंजनाचे साधन म्हणून बघतो टाळ्या वाजवतो . व हेच आपले इति कर्तव्य मानतो . आपली मुल या क्षेत्रात जावीत हे मनात ही आणत नाही . या कला त्याने दूर ठेवल्या आहेत .
बहुजन स्त्रिया बद्दल न बोललेलं बर त्यांना हे सर्व इतक निरस व काही तरी विचित्र वाईट वाटत . नाच गाण म्हणजे काही तरी वाईट प्रकार ही भावना अगदी घट्ट असते यात मुल मुली बिघडतील हे आपल्या घरा पर्यंत यायला नको याची ती काळजी घेत असतात . धार्मिक कार्यक्रमात काय होईल तेव्हडा तिचा संबंध येतो . आपल्या मुला मुलींना प्रत्सोहन देणारी आई जर अनभिज्ञ असेल तर हे आपल्या घरात व समाजात कसे रुजेल.
बदलत्या काळा बरोबर बदलावे लागेल . बहुजनाची पोरगी लावणी वर नाचली तर तिचा तमाशा होतो . व उच्चवर्णीय लावणी शिकून नाचली तर तिचा स्टेज शो होतो . ही बाब बरेच काही सांगून जाते . आम्ही आमच्या मुलांचे कौतुक कधी करणार व या क्षेत्रात आपली मुले पाठवून लक्ष देऊन पारांगत कसे होईल यासाठी धडपड कधी करणार . शास्त्रीय संगीत बहुजना पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संस्थांच्या प्रयत्नांना साथ कशी देणार याचा गंभीर्याने विचार केला पाहिजे.

नगारा संगीत महोत्सव एक प्रयत्न

अहमदनगर जिल्हा मराठा शिक्षण प्रसारक समाज या संस्थेने न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात संगीत विभाग सुरु केला . आकारावी पासून तो एम ए संगीत पर्यंत पोहचला आहे . ग्रामीण भागातील बहुजन मुलानं मध्ये क्षमता असते संधी मिळत नाही . ती इथे उपलब्ध करून दिली . खर तर हा खर्चिक भाग आहे . परंतु प्राचार्य डॉ. भास्कर झावरे सरांनी दूर दृष्टी ने ही जोखीम उचलली संस्था खंबीर पाठीशी राहिली . प्रयत्न सुरु आहेत . मुला बरोबर पालका समोर या क्षेत्रातील दिग्गज लोक नगारा उत्सवात निमंत्रीत केले जातात . खर्च हा भाग नसतो परतू ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक गायन व वाद्न क्षेत्रा बद्दल उदासीन वाटतो . बहुजन समाज व शास्त्रीय संगीत दोन ध्रुवावर उभे आहे यांची भेट घालण्याचा हा प्रयत्न आहे. ग्रामीण व शेतकरी कुटूंबातील मुले प्राध्यापक ,शास्त्रज्ञ ,डॉक्टरेत झाली तशी या क्षेत्रात विदुशी व पंडित व्हावीत या अपेक्षेने हे प्रयत्न नक्की सुरु राहतील . त्याचा भाग असणारा नगारा संगीत उत्सव ग्रामीण भागतील लोकांच्या सहभागा साठी महत्वाचा आहे . हा प्रयत्न नक्की यशस्वी होईल असा आशावाद बाळगायला हरकत नाही
———————————————————

Leave A Reply

Your email address will not be published.

राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळालेली खाती पुढिलप्रमाणे कॅप्टन कूल बद्दल तुम्हाला या गोष्टी माहितीय का ? बोल्ड फोटोशूटने प्रेग्नेंसीच्या अफवांना पूर्णविराम