दीड दिवसाची शाळा ते साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जीवनगाथा..
अण्णाभाऊ साठे Annabhau Sathe यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. सह्याद्रीच्या समृद्ध वारसा लाभलेल्या या गावानं खऱ्या अर्थाने त्यांच्यावर साहित्याचे (Annabhau Sathe) संस्कार केलेत त्यांच्या लेखणीतून जन्मलेल्या साहित्य आणि कलाकृतीमध्ये (Annabhau Sathe Jayanti) देखील या भागातली संदर्भ पाहायला मिळतात.

तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ अण्णाभाऊ साठे Annabhau Sathe म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. अण्णा भाऊ साठे हे मांग (दलित) समाजामध्ये जन्मलेले होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता पण नंतर ते आंबेडकरवादी झाले. दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
Flu Eye| महाराष्ट्रात डोळ्याच्या साथीचा फैलाव; ही लक्षणे दिसल्यास त्वरित करा हे उपचार.!

Table of Contents
दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊ साठे Annabhau Sathe यांनी आपल्या लेखनकाळातील अल्पायुष्यात 21 कथासंग्रह आणि 30 पेक्षा अधिक कादंबऱ्याही लिहिल्या. त्यापैकी सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले. अण्णाभाऊनी लिहलेल्या ‘फकिरा’ या कादंबरीला 1961 साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला
तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकिरा या मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे.थोडक्यात काय तर अण्णाभाऊ साठेच्या Annabhau Sathe साहित्याचा माणूस’ हा केंद्रबिंदू आहे. त्यांचे साहित्य हे तत्कालीन काळातील वास्तव जीवनाचे अपत्य आहे.

अण्णाभाऊ साठे Annabhau Sathe यांचे साहित्य देशाबाहेर अगदी पोलंड, रशियातही लोकप्रिय झालं. जनमानसात प्रसिद्ध झालं. अण्णाभाऊंच्या मते ग्रामीण जीवन टिकाऊ काया आहे, तर शहरी जीवन दिलखुलास आहे. महात्मा फुले, शाहू महाराज, आगरकर, लोकहितवादी, महर्षी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजक्रांतीचा ग्रामीण दलित जीवनातच पाया आहे आणि त्याच पायावर लिहिलेल्या अण्णा भाऊंच्या कथा-कादंबऱ्या ही साहित्यक्षेत्रात समाज संक्रमणाची पहिली किमया ठरली.
अत्यंत अल्पशिक्षित असला तरी उपजत शाहिराला चिंतनाची जोड आणि वैश्विक कार्याची जोड असेल तर तो अजोड साहित्यिकही होऊ शकतो, हे अण्णा भाऊंनी दाखवून दिले. अण्णाभाऊंची Annabhau Sathe लेखणी धारदार होती. पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तारली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे, असं ते म्हणत. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांची केवळ भारतीयच नव्हे, तर 22 भाषांत भाषांतरे झाली आहेत.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी लिहिलेलं “माझी मैना गावावर राहिली” हे गीत प्रचंड लोकप्रिय झालं. या गितातून त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील कामगारांच्या भावना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अण्णाभाऊंचं हे गीत चळवळीत सहभागी असलेल्या प्रत्येकाच्या ओठांवर होतं. शाहीर विठ्ठल उमप किंवा आनंद शिंदे यांच्या आवाजातील हे गीत ऐकलं तर आजही अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या 60 वर्षानंतरही हे गीत आजही तेवढंच समर्पक आणि लोकप्रिय आहे आणि हीच अण्णाभाऊ साठे Annabhau Sathe यांच्या लेखणीची जादू होती.