२०२३ या वर्षा मध्ये जामखेड तालुक्यात Jamkhed सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्या मुळे खरीपाची पीके वाया गेली आहेत. उडीद पिकाची बरीच जळ झाली होती. त्यामुळे तेही पीक वाया गेले होते.मुख्य रब्बी उत्पादक तालुका म्हणुन जामखेडची नोंद आहे. रब्बी पिकासाठी परतीच्या पावसाची आवश्यकता खुप असते परंतु परतीचा पाऊसही तालुक्यात झाला नाही. त्यामुळे खरीपा बरोबर रब्बीचे पीकही वाया जाण्याची वेळ तालुक्यावर आली आहे.
![](https://mahalokwani.com/wp-content/uploads/2023/11/WhatsApp-Image-2023-11-09-at-3.05.05-PM-768x1024.jpeg)
पावसा अभावी ज्वारी उगवत क्षमता कमी झाली आहे. ज्वारी पाहिजे तसी उगवली नाही. त्यामुळे केलेली दुबार पेर ही वाया गेली आहे. नाले बंदारे तळे पाझरतलाव या मध्ये पाणी न साठलयामुळे उभे उस व फळबागाचे नुकसान निश्चित आहे. तसेच ज्वारीचे पिक उगवले नसल्यामुळे पुढे जनावरांच्या चान्याच प्रश्न निर्माण होणार आहे. पाऊस कमी झाल्यामुळे विहिरी बारवांना नदी नाल्याला पाणी नाही त्यामुळे.
पुढे माणसाचा व जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होनार आहे. या बाबींचा विचार करून जामखेड तालुका दुष्काळ सदृश्य तालुका म्हणून जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी मधुकर राळेभात, राजेंद्र कोठारी,दत्तात्रय वारे,राजेंद्र पवार पा. शहाजी राळेभात,संभाजी राळेभात,प्रशांत राळेभात, अमित जाधव,कुंडल राळेभात,हरिभाऊ आजबे ,अवधुत पवार,विजय काशिद,प्रा. राहुल आहिरे,गणेश घायतडक,डॉ. कैलास हजारे डॉ. चंद्रशेखर नरसाळे , जयसिंग डोके,सचिन डोके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.