Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » dhananjay munde- karuna sharma | मी रखेल नाही मी धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे- करूणा शर्मा
ब्रेकींग न्यूज

dhananjay munde- karuna sharma | मी रखेल नाही मी धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे- करूणा शर्मा

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 6, 2025Updated:February 6, 2025No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे dhananjay munde- karuna sharma यांच्याविरुद्ध दिलेल्या कायदेशीर लढाईत मोठा विजय मिळवला आहे. फॅमिली कोर्टाने त्यांना धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी म्हणून मान्यता दिली आहे. वर्षानुवर्षे चाललेल्या या लढाईत त्यांना न्याय मिळाला असून, त्यांनी या लढाईत भोगलेल्या कष्टांचा उल्लेख केला आहे. त्यांचा दावा कोर्टाने अंशत: मान्य केला असून, मुंडे यांना पोटगी देण्याचा आदेशही देण्यात आला आहे.

Sangram Jagtap|जिथे हिंदू धोक्यात तिथे; आमदार संग्राम जगताप ठामपणे उभे राहणार

dhananjay munde- karuna sharma | मी रखेल नाही मी धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे

मी रखेल नाही. मी धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे. मला त्याचा विजय मिळाला. मी गेल्या तीन वर्षंपासून एकटी लढत आहे, माझ्याकडे पैसेही नव्हते, मी माझे सगळे दागिने विकून टाकले आणि लढत्ये, गाडी विकली. घर भाडे मी सात महिन्यापासून भरलं नाही. एकटी लढा देत आहे, अशा शब्दांत करूणा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप कोर्टाने अंशत: मान्य केले आहेत. आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहोत असा करुण शर्मा यांचा दावा होता. त्यासाठी मागच्या काही वर्षापासून त्या कायदेशीर लढाई लढत होत्या. फॅमिली कोर्टाने त्यांचा दावा मान्य केल्यानंतर आज करूणा शर्मा यांना यश मिळालं आहे. करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत हे कोर्टाने मान्य केलं.

1996 पासून आम्ही सोबत आहोत, आजपर्यंत माझ्यावर जो हिंसाचार झाला त्याची केस होती. हिंसाचार करू नका, असं कोर्टाने आदेश दिले. मला कलेक्टर ऑफिसमध्ये मारहाण केली, माझी गाडी फोडली. मी रखेल नाही मी धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे- करूणा शर्मा पोलीस माझ्या घराखाली राहायची. मला भीती होती म्हणून मुंबई सोडली. पोलीस कधीही येईल आणि मला उचलून नेतील अशी मला भीती होती. म्हणून मी मुंबई सोडली आणि बीडमध्ये राहते. आता मी बीडमध्ये सेफ आहे. मी आठवड्याला मुंबईत येत असते

Table of Contents

  • dhananjay munde- karuna sharma | मी रखेल नाही मी धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे

याची किंमत चुकवावी लागते

हा लढा माझा सुरू आहे. पण मुलाबाळांना या प्रकरणाची किंमत चुकवावी लागत आहे. माझ्या नवऱ्याला ते समजत नाही. माझी तिसरी मुलगी आहे. तुझा बाप काय करतोय हे तिला विचारणार नाही. पण मला तुरुंगात टाकलं तेव्हापासून आजपर्यंत माझा मुलगा आणि मुलगी शाळेत गेले नाहीत. धनंजय मुंडेंची बायको होण्याची किती मोठी किंमत चुकवावी लागली आम्हाला अशा शब्दांत त्यांनी त्यांची व्यथा मांडली.

तुमच्यासाठी मी करुणा शर्मा आहे. पण माझ्यासाठी मी करुणा धनंजय मुंडे dhananjay munde आहे,असं त्यांनी नमूद केलं. माझं ते प्रेम होतं. लग्न कोणीही करतं. पण प्रेम होणं ही मोठी गोष्ट आहे. 16 व्या वर्षापासून 45वर्षापर्यंत कोणी कोणासोबत असं राहत नाही. प्रेम होते म्हणून तर राहिले ना. दोन मुलं झाली, असंही त्या म्हणाल्या.

माझ्या मनात आत्महत्येचे विचार येतात

मला पोटगी मिळाली हा माझा विजय आहे. माझी आई नव्हती. मला तुरुंगात टाकल्यापासून माझ्या बहीण आणि भावाने माझा नंबर ब्लॉक केला आहे. मी एकटीच लढत आहे. तीन वर्षापासून एकटीच लढत आहे. आई असती तर माझ्यावर ही वेळ कधीच आली नसती. माझ्या मनात आत्महत्येचे विचार येतात. जेव्हा हे विचार येतात तेव्हा माझ्या आईचा चेहरा डोळ्यासमोर येतो. ती आत्महत्या करून मेली. तिने आमचा विचार केला नाही, असे सांगताना आईच्या आठवणीने भावूक झालेल्या करूणा शर्मांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते.

पहिली बायको म्हणून मला ऑर्डर दिली आहे. बायको नसल्याने पोटगी देऊ नये असं त्यांच्या वकिलाचं म्हणणं होतं. पण कोर्टाने मला बायको म्हणून मान्यता दिली आहे. कोर्टाचा निकाल मला मान्य नाही. मी हायकोर्टात जाणार आहे. मला 15 लाख रुपये पोटगी हवी आहे. घराचं भाडं 1 लाख 70 हजार आहे. हे भाडं भरलं जात नाही. मेंटेनन्स ३० हजार दर महिना आहे. मुलगा बेरोजगार घरात आहे. दोन लाखात काय होणार,सा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मी रखेल असते तर 50 कोटी रुपयांचे कन्स्ट्रम हायकोर्टात फाईल केलेलं आहे. हवंतर मी त्याची कॉपी देईन. मी रखेल नाही. मी धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे, असा पुनरुच्चार करूणा शर्मा यांनी केला.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleSangram Jagtap|जिथे हिंदू धोक्यात तिथे; आमदार संग्राम जगताप ठामपणे उभे राहणार
Next Article CIBIL Score| तुमचा सिबिल स्कोर इतका आहे ना..? नाहीतर लग्न मोडेल; घडली धक्कादायक घटना..!
mahalokwani
  • Website

Related Posts

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

May 15, 2026

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

May 8, 2026

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

April 29, 2026

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.