राज्यातील महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण योजना’ Ladki Bahin Yojana 2026 पुन्हा चर्चेत आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो महिलांसाठी आता मोठी खुशखबर समोर आली आहे. राज्यभरातील अनेक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून, मोबाईलवर मेसेज देखील येऊ लागले आहेत.
Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500

महिलांच्या खात्यात किती रुपये जमा झाले?
मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांचे मिळून तब्बल 3000 रुपये जमा होतील, अशी अपेक्षा महिलांकडून व्यक्त केली जात होती. काही ठिकाणी 4500 रुपये मिळणार असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात अनेक महिलांच्या खात्यात सध्या फक्त 1500 रुपये जमा झाल्याचे समोर आले आहे.
यामुळे महिलांमध्ये काही प्रमाणात संभ्रम निर्माण झाला असला, तरी उर्वरित हप्त्याबाबत सरकारकडून पुढील टप्प्यात निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अनेक महिलांना मोबाईलवर मेसेज
आज राज्यातील अनेक लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा झाल्याचा SMS प्राप्त झाला. त्यामुळे महिलांनी तातडीने आपले बँक खाते किंवा DBT स्टेटस तपासावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
Table of Contents
KYC न केल्यास लाभ थांबू शकतो
दरम्यान, शासनाकडून लाभार्थी महिलांना पुन्हा एकदा KYC करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सुरुवातीला 31 मार्च 2026 पर्यंत KYC पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर ही मुदत वाढवून 30 एप्रिल 2026 करण्यात आली.
ज्या महिलांनी अद्याप KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांच्या खात्यावर हप्ता जमा होण्यात अडचणी येऊ शकतात, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
योजनेच्या अटी व नियमांचे उल्लंघन करून लाभ घेत असलेल्या काही महिलांची नावे शासनाने योजनेतून वगळल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे लाभार्थींची संख्या काही प्रमाणात कमी झाली असल्याचे बोलले जात आहे.

महिलांनी काय करावे?
- बँक खात्याचा बॅलन्स तपासा
- DBT स्टेटस चेक करा
- KYC पूर्ण झाली आहे का ते खात्री करा
- आधार आणि बँक खाते लिंक आहे का ते तपासा
लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता आणि उर्वरित रकमेबाबत सरकार लवकरच अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.