Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू
ब्रेकींग न्यूज

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

mahalokwaniBy mahalokwaniApril 9, 2026Updated:April 9, 2026No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Sandip gaikwad news - 1
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

छत्रपती संभाजीनगर : जामखेड jamkhed येथील बहुचर्चित आत्महत्येच्या प्रकरणात आरोपी संदीप सुरेश गायकवाड sandip gaikawad याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती शैलेश पी. ब्रह्मे यांनी ६ एप्रिल २०२६ रोजी हा आदेश दिला.

सदर प्रकरणात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ६४८/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित नर्तिकेने ४ डिसेंबर २०२५ रोजी साई लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात आरोपीने लग्नासाठी दबाव टाकत मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता.

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर

सुनावणीदरम्यान आरोपीच्या वतीने अॅड. सत्यजित बाळासाहेब पवार यांनी युक्तिवाद करताना नमूद केले की, साक्षीदारांच्या जबाबांमध्ये कोणताही ठोस छळ अथवा सातत्यपूर्ण त्रास दिसून येत नाही. तसेच, सीसीटीव्ही फुटेजमधूनही आरोपीकडून कोणतीही प्रत्यक्ष आक्षेपार्ह कृती झाल्याचे आढळत नाही. न्यायालयानेही उपलब्ध पुराव्यांचा विचार करून आत्महत्येस प्रवृत्त करण्याइतका ठोस आणि गंभीर छळ सिद्ध होत नसल्याचे निरीक्षण नोंदवले.

न्यायालयाने नमूद केले की, साक्षीदारांच्या जबाबांमध्ये छळाचे ठोस तपशील नाहीत तसेच आरोपीच्या कथित कृत्यांमुळे आत्महत्येचा थेट संबंध जोडणारा स्वतंत्र पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे आरोपीला जामीन देणे योग्य असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

दरम्यान, या प्रकरणाला राजकीय पार्श्वभूमीही लाभली होती. आरोपी संदीप गायकवाड हा जामखेडमधील माजी नगरसेवक असून त्याचे विविध राजकीय पक्षांशी संबंध राहिले आहेत. २०१६ च्या नगरपरिषद निवडणुकीत तो राष्ट्रवादीकडून निवडून आला होता. त्यानंतरच्या काळात त्याने विविध राजकीय घडामोडींमध्ये सहभाग घेतला असून २०१९ च्या निवडणुकीत तो आमदार रोहित पवार यांच्या संपर्कात होता, तसेच पुढे राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचेही समोर आले आहे.

Table of Contents

  • sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर

तसेच, या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करत प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती, ज्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग चढला होता.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleAshok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता
Next Article ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी
mahalokwani
  • Website

Related Posts

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

May 15, 2026

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

May 8, 2026

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

April 29, 2026

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.