Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी
ब्रेकींग न्यूज

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

mahalokwaniBy mahalokwaniApril 22, 2026Updated:April 22, 2026No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

📍 नाशिक | प्रतिनिधी

नाशिकमधील बहुचर्चित प्रकरणातील आरोपी अशोक खरात ashok kharat याची विशेष तपास पथक (SIT) कडून सुरू असलेल्या चौकशीदरम्यान प्रकृती अचानक बिघडल्याची घटना घडली. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने कार्डियाक ॲम्बुलन्स मागवून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान खरात यांना मळमळ, उलट्या आणि तीव्र डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला. तसेच छातीत दुखत असल्याची तक्रारही त्यांनी केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वैद्यकीय पथकाला बोलावण्यात आले असून, प्राथमिक तपासणीनंतर काही काळ त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच खरात यांच्या वकिलांनी त्यांना न्यूरोलॉजिकल समस्या असल्याचा दावा करत न्यूरोसर्जनकडे उपचारासाठी पाठवण्याची मागणी न्यायालयात केली होती. अशातच चौकशीदरम्यान प्रकृती बिघडल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ashok kharat आर्थिक व्यवहारांवर SIT ची नजर

या प्रकरणाच्या तपासात SIT कडून संबंधित आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे. शहरातील एका नामांकित हॉटेल व्यावसायिकाला चौकशीसाठी पाचारण करण्यात आले होते. जवळपास सहा तास चाललेल्या या चौकशीत आर्थिक हितसंबंध, संशयास्पद व्यवहार तसेच जमीन खरेदी-विक्रीशी संबंधित बाबींवर विचारणा करण्यात आली. चौकशीनंतर संबंधित व्यावसायिकाला सोडण्यात आले असून, तपास यंत्रणेला काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याची माहिती आहे.

अशोक खरातची प्रकृती बिघडली

उद्या न्यायालयात हजेरी

अशोक खरात यांची पोलीस कोठडी उद्या संपत असल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तपासाच्या प्रगतीचा विचार करता, कोठडी वाढवून मिळावी यासाठी पोलिसांकडून मागणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सदर प्रकरणात फसवणूक आणि अंधश्रद्धा पसरवल्याचे गंभीर आरोप असून, आर्थिक गैरव्यवहाराचा तपास निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articlesandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू
Next Article massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी
mahalokwani
  • Website

Related Posts

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

May 15, 2026

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

May 8, 2026

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

April 29, 2026

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.