Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?
ब्रेकींग न्यूज

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

mahalokwaniBy mahalokwaniMarch 13, 2026Updated:March 13, 2026No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

कल्याण : कल्याण शहरात पतीने पत्नीची निर्घृण हत्या murder केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे गुन्हा केल्यानंतर आरोपी स्वतः नाशिकला जाऊन पोलिसांसमोर हजर झाला आणि “मी बायकोला मारून आलोय” अशी थेट कबुली दिली. हे ऐकून पोलिसही काही क्षण हादरून गेले.

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले

मिळालेल्या माहितीनुसार, विशाल भुतकर असे आरोपीचे नाव असून तो कल्याणमधील उंबर्डे परिसरात राहतो. त्याची पत्नी अर्चना भुतकर हिच्यावर तो सतत चारित्र्याचा संशय घेत होता. या कारणावरून दोघांमध्ये अनेक महिन्यांपासून वाद होत होते. घरातील सततच्या भांडणांमुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते.

दरम्यान, गुन्ह्याच्या दिवशी विशाल उंबर्डे येथे आला असता पती-पत्नीमध्ये पुन्हा जोरदार वाद झाला. रागाच्या भरात विशालने अर्चनाचा गळा आवळून तिची हत्या केली. गुन्हा केल्यानंतर तो थेट नाशिकला निघून गेला.

Table of Contents

  • murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले

नाशिकमध्ये पोहोचल्यानंतर त्याने सर्वप्रथम आपल्या भावाला घडलेली घटना सांगितली. त्यानंतर भावाने त्याला नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात नेले. तेथे विशालने पोलिसांसमोर “मी बायकोचा खून करून आलोय” अशी कबुली दिली. अचानक दिलेल्या या कबुलीमुळे पोलिसही काही काळ स्तब्ध झाले.

विशालच्या कबुलीनंतर नाशिक पोलिसांनी तात्काळ कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची खातरजमा केली. तपासात अर्चनाचा खून झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी विशाल भुतकर याला ताब्यात घेतले.

या घटनेमुळे भुतकर दांपत्याच्या दोन मुलांवर मोठा आघात झाला आहे. आईचा मृत्यू आणि वडील तुरुंगात अशी दुर्दैवी परिस्थिती या मुलांवर ओढावली आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleGas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली
Next Article Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ
mahalokwani
  • Website

Related Posts

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

April 22, 2026

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

April 9, 2026

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

March 30, 2026

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.