कर्जत- कोपर्डी | NDRF च्या टीमला सागर बरेला हाती लागला परंतु; तोपर्यंत त्याची प्राणज्योत मावळली..
महालोकवाणी न्यूज:-
कोपर्डी ( Kopardi) येथे काकासाहेब सुद्रिक यांच्या शेतामध्ये सागर बरेला हा ऊस तोडणी करणाऱ्या कामगारचा मुलगा खेळता खेळता संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान बोअरवेल मध्ये पडला ही घटना गावामध्ये कळण्यास सहा वाजले होते गावात घटना माहिती झाल्यानंतर त्या ठिकाणी ग्रामस्थांनी जाऊन मदतीचा सर्वात परी प्रयत्न केले . मी पुणे येथे काय कामानिमित्त गेलेलो असताना मला गावातील तरुणांचे व सरपंच शांतीलाल सुद्रिक यांचा फोन आला तसेच शेतामध्ये पडलेल्या काकासाहेब सुद्रिक यांनी सुद्धा फोन करून मदतीसाठी शासकीय यंत्रणेस संपर्क करण्यास सांगायला सांगितले. त्यानंतर मी आमदार रोहित पवार यांना या गोष्टीची कल्पना दिली त्यांनी प्रशासनाशी संपर्क करून पुणे व नगर येथून NDRF टीम ची रवाना करण्यास सांगितले. आमदार रोहित पवार यांच्या यंत्रणेतील दिनेश कारंडे श्याम निकाळजे केशव शेलार यांनी घटनेची तात्परता प्रसंगावधान ओळखून ॲम्बुलन्स घेऊन घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर रोहित दादा पवार यांनी फोन करून स्वतःची पोकलेन मशीन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले तसेच गावातील तरुण गणेश लिहिणे व दिनेश सुद्रिक यांच्याही जेसीबी त्या ठिकाणी तत्काळ उपलब्ध झाल्या त्यांनी खोदकामास सुरुवात केली.
प्रशासनामधील पोलीस अधिकारी प्रांत बीडिओ हे सर्वजण तत्काळ घटनास्थळी दाखल झाले साडेआठच्या दरम्यान पुणे व नगर येथील NDRF ची ही घटनास्थळी आली आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन चालू केली मीही पुणे इथून तत्काळ निघून घटनास्थळी साडेनऊच्या दरम्यान आलो तसेच रोहित दादा पवार यांच्या सतत संपर्क असल्याने त्यांनी पुणे येथील डिजिटल यंत्रणा कॅमेरा हेही बरोबर पाठवून दिले पुणे इथून येणारे यंत्रणा बरोबरच मी घटना स्थळी आलो.आ रोहित पवार यांनी पोकलेन मशीन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्याने खोदकामस सहकार्य झाले. नांदगाव येथील आमचे शेजारी सहकारी नितीन विटकर यांचाही ब्लास्टिंग ट्रॅक्टर त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला त्यांनीही खोदकामात चांगले सहकार्य केले एकूण रात्री अडीच वाजेपर्यंत हे खोदकाम चालू होते अखेर NDRF चे टीमला सागर हाती लागला परंतु तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती.