शेवगाव/प्रतिनिधी : इसाक शेख
दि. २९/०४/२०२३ दैनंदिन जीवन जगत असतांना सामाजिक परिस्थितीमध्ये सर्वधर्मीय समाज बांधवांनी आपली एकात्मता जपत सामाजिक समता, बंधुता अबाधित राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. बोधेगाव सह परिसरातील बदलत्या सामाजिक व धार्मिक परिस्थितीला निव्वळ या भागातील काही मूठभर राजकीय विघातक प्रवृत्तीचे पुढारी कारणीभूत असून या सर्व गोष्टींना विरोध करणे हे प्रत्येकांचे कर्तव्य असून येथून पुढच्या काळात जाती-धर्माच्या नावाखाली आपली राजकीय पोळी भाजणाऱ्या तसेच जातीजातीत भांडणे लावणाऱ्या काही ठराविक राजकीय पुढाऱ्यांची गय केली जाणार नाही त्यासाठी आमची रस्त्यावर उतरण्याची तयारी असून येथून पुढच्या काळात बोधेगाव सह परिसरातील सर्वसामान्य, गोरगरीब, गरजूवंत जनतेच्या मागे आम्ही दोघे ( काकडे व पठाण ) सदैव उभे राहून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते फिरोज पठाण यांनी केले.
हे नक्की वाचा: पंजाबराव डख यांचे मान्सून संदर्भात मोठे भाकीत; या दिवशी होणार मान्सून महाराष्ट्रात दाखल.! पहा आणखी काय म्हटले
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे सामाजिक कार्यकर्ते फिरोज पठाण यांच्या निवासस्थानी रमजान ईद निमित्त बोधेगाव सह परिसरातील हिंदू-मुस्लिम समाजाच्या बांधवांना एकत्र बोलावून ईद मिलनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी आयोजित ईद मिलनच्या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते फिरोज पठाण हे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बोधेगावचे उपसरपंच नितीन काकडे होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते फिरोज पठाण, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा उपसरपंच नितीन काकडे, केदारेश्वरचे तज्ञ संचालक मयूर हुंडेकरी, मौलाना माजिद साहब, बबन कुरेशी, ग्रामपंचायत सदस्य महादेव घोरतळे, सामाजिक कार्यकर्ते बाबा पठाण, जेष्ठ पत्रकार अनिल कांबळे, पत्रकार उद्धव देशमुख, पत्रकार इसाक शेख, सामाजिक कार्यकर्ते बन्सी मिसाळ, संतोष बानाईत, हारून शेख, भगवान मिसाळ, लोक कलावंत विष्णू मिसाळ, ताहेर सय्यद, गोविंद मगर, सुनील माने, राजू शेख, लियाकत शेख, समीर शेख, कय्यूम शेख, निसार टेलर, अल्ताप पठाण, अनिस सय्यद, हारून शेख, शरूख शेख, गुलाम हुसेन, माऊली पडोळे, आयुब बागवान, रमजू बागवान, हुसेन बागवान, गणेश लुक्कड, दत्तू मिसाळ, शोकत हलवाई, यांच्यासह बोधेगाव, बालमटाकळी, हातगाव, मुंगी यासह पंचक्रोशीतील हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक बाबा पठाण यांनी केले तर आभार वाटचाल परिवर्तनाचे अध्यक्ष प्रमोद मिसाळ यांनी मानले.