जामखेडमध्ये येणाऱ्या काळातील सर्व निवडणुका लढवण्याची तयारी सुरु करा – बाबूशेठ टायरवाले
जामखेड प्रतिनिधि – धनराज पवार
जामखेड शहरातील सेंटर काॅम्प्लेक्स येथील शिवसेना भवन येथे जिल्हा अध्यक्ष बाबूशेठ टायरवाले यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.०० वाजता जामखेड तालुका कार्यकारिणीचा विस्तार संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती शिवसेना तालुका प्रमुख प्रा कैलास माने सर व गणेश सुरवसे तालुका उपप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली जामखेड तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या बैठकीत विविध पदांवर पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा आजच्या तरुणांनी पुढे चालवावा लागणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे जनतेसाठी अहोरात्र मेहनत घेऊन कामे करत आहेत, तसेच तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून सामाजिक कार्य करण्याचे काम शिवसैनिकांनी केले, काँग्रेस पक्षात घराणेशाही आहे तसेच अख्ये आयुष्य घालणाऱ्या पुढाऱ्यांना तिकीट तर सोडाच कोणते पद नाही परंतु उमेदवारी सुध्दा नाही,सर्व सामान्य व छोट्या कार्यकर्त्यांना मोठे करण्याचे काम शिवसेना या पक्षाने केले आहे.आजच्या तरुणांनी घरातील विविध कामे, यामध्ये शेती/ व्यावसाय बघुन आठवड्यातून एक दिवस पक्षासाठी काम केले पाहिजे,
Personal Loan| वैयक्तिक कर्ज मिळवा सर्वात कमी व्याजदरात; कर्ज मिळविण्यासाठी या 5 टिप्सचा वापर करा.!
यावेळी बोलताना जिल्हा अध्यक्ष बाबूशेठ टायरवाले म्हणाले कि, येणाऱ्या नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूका लढवण्यासाठी पक्ष सर्व ताकदीनिशी उतरणार आहेत, परंतू पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सभासद नोंदणी करण्यासाठी कामा लागावे,शिर्डी येथे होणाऱ्या “शासन आपल्या दारी ‘ कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे . सर्वांनी पक्ष वाढीसाठी एकजुटीने कार्य करायचे आहे, पक्ष निधी मार्फत आपण कार्यकर्त्यांना मजबुती देण्याचे कार्य करणार आहोत, येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला सर्वच निवडणुकांच्या जागा लढवायच्या आहेत, युवा वर्गातील तरुणांना काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे

Table of Contents
यावेळी तालुकाप्रमुख प्रा कैलास माने म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या “शासन आपल्या दारी ‘ या योजनेच्या माध्यमातून जोमाने काम सुरू आहे,१७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मेळाव्यासाठी कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात आली होती.शिवसेनेला तालुक्यामध्ये वाढता प्रभाव व पाठिंबा तसेच येणाऱ्या आगामी निवडणुका साठी तालुक्यात पक्षाचा विस्तार वाढवणे गरजेचे तसेच जामखेड तालुक्यातील आठ गावांमध्ये शाखाप्रमुख व खर्डा जिल्हा परिषद गटांसाठी तालुका उपप्रमुख शहरप्रमुख या पदांवर नियुक्ती करण्यात आली असून भाजपाकडून सन्मानाने जागा वाटप न झाल्यास स्वबळावर पक्ष प्रमुख यांच्या आदेशानुसार निवडणूक लढविणार

शिवसेनेच्या जामखेड तालुका कार्यकरणी मध्ये तालुका उपप्रमुख गणेश सुरवसे , गहिनीनाथ जगताप – शहरप्रमुख खर्डा, किशोर समुद्र – शिऊर गणप्रमुख ,रणजित समुद्र – शाखा प्रमुख,बाळु खाडे,शाखा प्रमुख ( दरडवाडी),लखन श्रीरामे , शाखा प्रमुख ( मोहरी), आकाश केकाण , शाखा प्रमुख (जायभायवाडी),लहु सुरवसे , शाखा प्रमुख ( मुंगेवाडी), जयकुमार वारे, शाखा प्रमुख ( बांधखडक), विजय घुगे, शाखा प्रमुख (आनंदवाडी), अमोल ढाळे , शाखा प्रमुख (तरडगाव) यावेळी जिल्हा अध्यक्ष बाबूशेठ टायरवाले यांनी सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन केले.

यावेळी जिल्हा अध्यक्ष बाबूशेठ टायरवाले, अहमदनगर दक्षिण जिल्हा शिवदूत गणेश मोरे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा कैलास माने सर, तालुका उपप्रमुख गणेश सुरवसे, शहराध्यक्ष देविदास भादलकर, कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख दिपक जंजीरे,जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष मुस्तफा शेख (मेजर), जामखेड तालुका दलित आघाडी उपप्रमुख पांडुरंग समुद्र, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष मोहसीन सय्यद, सुशिल शिंदे, खर्डा,महिला आघाडीच्या तालुका प्रमुख वैशालीताई मुरुमकर, उपप्रमुख मिराताई तंटक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.