नेमका कोणी चोरला जामखेडचा पुढारी वड..! वडावरून राजकारण
महालोकवाणी न्यूज: संपादक- सचिन कांबळे
जामखेड/कर्जत:
१४ फेब्रुवारी 2023 रोजी जामखेड शहरातील नगर रोड येथील पुढारी वडाच्या झाडाची (वटवृक्ष) पुजा बिभिषण (मामा )धनवडे नगरसेवक तथा जामखेड शहर अध्यक्ष भाजपा यांच्या हस्ते तसेच मान्यवरांच्या उपस्थित अखेरचा निरोप देण्यात आला. या प्रसंगी नगरसेवक डाँ ज्ञानेश्वर झेंडे,शिवसेना तालुका प्रमुख प्रा.कैलास माने सर, अनिल यादव ,गणेशशेठ डोंगरे,शिवकुमार डोंगरे, वैभवशेठ कार्ले,भाऊ काशिद, अर्जुन म्हेत्रे, रविंद्र कडलग, भरत राळेभात, सचिन भंडारी,बंडू ढवळे आदी उपस्थित होते.
या पुढारी वडापासून अनेक जणांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाले आहेत, तसेच या वडापासून अनेकांचे राजकारण सुरू झाले आहे. व कित्येक जणांचे राजकारण संपुष्टात पण आले आहेत, तर कित्येक कार्यकर्ते कर्जबाजारी पण झाले आहेत, त्यामुळे हा वड एक अनोखी ओळख देऊन, अखेरचा निरोप घेत असताना याविषयी मात्र शंका निर्माण झाली की, हा वड नेमका कोणाचा किंवा कोणत्या पक्षाचा?
यावरून राजकारण होताना दिसत आहे 14 फेब्रुवारी 2023 रोजी भाजपाच्या( Bjp) कार्यकर्त्यांनी वडाची पूजा केली त्यानंतर त्या वडाचे खोड व्यवस्थित काढून घेतले व हे वडाचे झाड आठवणीत राहावे म्हणून याची लागवड केली जाणार होती, पण ते खोड दोन-तीन दिवस त्याच ठिकाणी राहिले
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या(ncp) कार्यकर्त्यांनी दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळीच हे खोड उचलून जवळच असणाऱ्या विंचरणा नदीच्या काठावर लावण्याचे नियोजन तयार करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, जेष्ठ नेते प्रा.मधुकर राळेभात , शहराध्यक्ष राजेंद्र गोरे,सुर्यकांत मोरे,उमरभाई कुरेशी, नगरसेवक मोहन पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शहर उपाध्यक्ष प्रा.राहुल आहिरे,युवक चे तालुका अध्यक्ष अमोल गिरमे, रमेश आजबे, काकासाहेब राळेभात,हरिभाऊ आजबे , डॉ. चंद्रशेखर नरसाळे ,सचिन शिंदे, वसीम सय्यद ,गणेश हगवणे , आमदार रोहित पवार यांचे स्विय सहायक नंदकुमार हंगे,बालाजी पोटे,अंगद वाळुंजकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पण यावरून राजकारण मात्र तापले आहे, हा वड नेमका कोणाचा किंवा कोणत्या पक्षाचा आहे हे मात्र सिद्ध करण्याचे वेळ आली आहे. जे बाहेरून आलेत त्यांना या वडाचे महत्व काय समजणार अशी टिका भाजपचे कार्यकर्ते करतांना दिसत आहेत, पण ज्या प्रकारे दोन्ही पक्षानी प्रसिद्धी मिळवण्यासाठी नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी घाई केली, तशी या पुढारी वडाची (pudharivad) देखभाल होते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.