दिनांक 29 एप्रिल 2019 रोजी दुपारी दोन वाजता अहमदनगरमध्ये पाऊसाला सुरुवात झाली अहमदनगर जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यामध्ये गारपीट सह पाऊस पडला यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नूकसान झाले आहे. मात्र सरकारने कोणतीही आर्थिक मदत अजून जाहीर केलेली नाही
#अहमदनगर #अवकाळीपाऊस #पंजाबरावडख pic.twitter.com/i3hLirpk2h
— Mahalokwani (@mahalokwani) April 29, 2023
काही दिवसापूर्वी हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी या संदर्भात एक अंदाज वर्तवला होता नगर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात पण मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडणार आहे अहमदनगर जिल्ह्यसाह इतर ठिकाणी सुध्दा पाऊस पडणार असा अंदाज डख यांनी वर्तवला होता.
हे नक्की वाचा:- पंजाबराव डख यांचे मान्सून संदर्भात मोठे भाकीत; या दिवशी होणार मान्सून महाराष्ट्रात दाखल.! पहा आणखी काय म्हटले
महिन्याहून अधिक दिवस होऊन गेले मात्र अवकाळी पाऊस थांबायचं नाव घेत नाही. राज्यात एप्रिल महिन्यात २८, २९, ३० या तारखेला विजांसह वादळी वारा आणि गारपिटीची शक्यता असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख panjabrao Dakh यांनी वर्तवला आहे.
राज्यातील विदर्भ, मध्य महाराष्ट्रात, मराठवाडा या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भ या भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. इतर भागात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यासह, वादळी पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.
हवामान अंदाजासाठी पंजाबराव डख हे नाव अलीकडे शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय बनले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या नावाची एका प्रकारची सणसणीच पाहायला मिळते. हा अवलिया आपला हवामान अंदाज एका मिनिटात लाखो शेतकऱ्यांना व्हाट्सअपच्या आणि youtube च्या माध्यमातून सांगत असतो