जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
१ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या पुढाकारातून होत आहे.
भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.आज रोजी सकाळी १० वाजता रक्तदान शिबीराचे उद्घाटन तहसिलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
रक्तदानामुळे मृत्युच्या दारात असलेल्या व्यक्तीला जीवनदान देता येते. योग्य वेळेत योग्य व्यक्तीला योग्य ते रक्त मिळाल्यास त्या व्यक्तीचे प्राण वाचतात. अनेक ठिकाणी रक्ताचा तुटवडा आहे. आणि हाच तुटवडा लक्षात घेऊन गोर गरीब व्यक्तीला जीवनदान देण्याचे कार्य रक्तदान शिबिरा सारख्या कार्यक्रमातून रक्तदान शिबीर आयोजित केले.रक्तदानासारखे पवित्र कार्य कोणतेही नाही. असे मत तहसिलदार योगेश चंद्रे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी जामखेड (jamkhed) तहसिलदार योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक महेश पाटील,मुख्याधिकारी अजय साळवे ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल बोराडे, अधिक्षक डॉ. शशांक वाघमारे, तालुका कृषि अधिकारी राजेंद्र सुपेकर, कृषि विस्तार अधिकारी अशोक शेळके ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे नेते प्रा मधुकर राळेभात, वंचित बहुजन आघाडी चे नेते अँड डाँ अरुण जाधव, मंगेश (दादा) आजबे, अँड हर्षल डोके,नगरसेवक शामीर सय्यद, बापुसाहेब गायकवाड,मोहन वस्ताद पवार,गुलचंद अंधारे, पवनराजे राळेभात, अमित जाधव, प्राचार्य विकी घायतडक सर,शिवव्याख्याते प्रा.जाकीर शेख सर, ताहेर खान,
सामाजिक कार्यकर्ते विनायक राऊत/विकीभाऊ सदाफुले, उपसरपंच अशोक रंधवे,योगेश अब्दूले,डिगांबर राळेभात,प्रा राहुल अहिरे, अनिल बाबर,आनंद राजगुरू,मुकूंद घायतडक, वसीम सय्यद,सचिन सदाफूले,प्रिन्स सदाफुले,रवि सोनवणे, स्वप्नील सदाफूले,किशोर कांबळे आदी रक्तदाते व नागरिक मोठ्या उपस्थित होते.
रक्तदानासाठी जामखेड (jamkhed) पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी प्रथम रक्तदानाला सुरवात केली,25 पोलीस बांधवासह
तसेच शहरातील युवकांनी व तरुणींनी रक्तदान शिबीरामध्ये सहभागी होवून रक्तदान करण्यास सुरवात केली आहे.या शिबीरामध्ये १५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.जामखेडचे पोलीस (jamkhed police) निरीक्षक महेश पाटील यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.तसेच रक्तदान शिबीरासाठी विशेष सहकार्य न्यू अर्पण व्हाँलेन्ट्ररी ब्लड बैंक संचलिका भाग्यश्री पवार ,जनकल्याण रक्तपेढी केंद्र चे शरद बळे, सुधीर माले,सुप्रिया कांबळे व नगरसेवक शामीर सय्यद यांनी केले आहे.यशस्वीतेसाठी पोलीस नाईक अविनाश ढेरे ,पोलीस कॉन्स्टेबल संदिप आजबे आदींनी परिश्रम घेतले