
रविवार दिनांक 28 मे 2023 रोजी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते , यावेळी त्यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या, व आरोग्य विषयक परिस्थितीचा आढावा घेतला, मंगेश चिवटे यांचे आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम चालू आहे, कोणताही भेदभाव न करता ज्यांना उपचाराची खरच गरज आहे, त्यांची परिस्थिती नाजूक आहे, यांच्या मदतीसाठी चिवटे साहेब सदैव तत्पर असतात, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची सर्व प्रथम संकल्पना ही मंगेश चिवटे यांनी देवेन्द्र फडणवीस यांच्या काळात मांडली होती, त्या नंतर त्यांचे काम पाहता चिवटे यांनाच या खात्याचे प्रमुख करण्यात आले आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पण मंगेश चिवटे यांनाच पसंती दिली आहे.

त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील गरजू रुग्णांना ही सेवा मोफत दिली आहे, त्यांच्या या कामावर अनेक जण कौतूक करत आहे, ते अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता ते बोलत होते की, अहमदनगर जिल्ह्यातील ज्या रुग्णांना खरच गरज आहे त्यांनी माझ्याशी किंवा प्रत्येक ठिकाणी आमचे कक्ष स्थापन करण्यात आले आहेत त्या ठिकाणी संपर्क करावे, त्यांना सर्वस्वी मदत करण्यात येईल,
जामखेड शिवसेना तालुका प्रमुख प्रा. कैलास माने यांचे कार्य उत्तम आहे , त्यांनी आत्तापर्यंत अनेक रुग्णांना मदत मिळवून दिली आहे, त्यांनी असेच गोरगरिबांच्या आरोग्यच्या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित करून ते आमच्या पर्यंत आणावे, त्या सर्वांना मदत करण्यात येईल, व या उपचार झालेल्या रुग्णांचे आशीर्वाद नेहमी प्रा. कैलास माने यांच्या सोबत असतील.
यावेळी मंगेश चिवटे यांचा सत्कार करताना जामखेड शिवसेना तालुका प्रमुख प्रा. कैलास माने, अहमदनगर शिवसेना दक्षिण प्रमुख बाबूशेठ टायरवाले, मुस्तफा शेख( मेजर) महिला आघाडी अध्यक्षा शबनम इनामदार उपस्थित होते