राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी दोन दिवसापूर्वी पक्षाच्या अध्यक्ष पदावरून पायउतार होण्याचा अनपेक्षितपणे घेतलेला निर्णय असंख्य कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला होता.सर्वांच्या भावना व मागणी ‘साहेब तुम्हीच’ आमच्यासाठी सह्याद्री असून आपला निर्णय रद्द करावा यासाठी भावना तीव्र होत्या.

यासर्वांच्या भावनांचा विचार करून आदरणीय साहेबांनी अध्यक्षपदी कायम राहण्याचा निर्णय जाहीर केला असल्याने कार्यकर्ते आनंदी झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जामखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी,शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष उमरभाई कुरेशी, तालुका सरचिटणीस प्रकाश काळे,जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक प्रकाश सदाफुले, शहर उपाध्यक्ष प्रा.राहुल आहिरे, दादा महाडिक, इमरान तांबोळी, कांतीलाल शिंदे, चाँद भाई शेख,जाकीर शेख,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जामखेड येथील खर्डा चौकात फटाके फोडून ,घोषणा देत जल्लोष साजरा केला.