शेवगाव तालुक्यातील हातगाव – कांबी येथील शेतकऱ्यांनी आज दिनांक 26 मे 2023 रोजी अनोखे आंदोलन केले,
वेळोवेळी स्थनिक लोकप्रतिनिधी तसेच मंत्री महोदय जिल्हाधिकारी कार्यालय, मंत्रालय अशा अनेक शासकीय ऑफिसात हा प्रश्न उपस्थित केला आहे. माघील 3 वर्षांपासून या संदर्भात विचारणा केली आहे परंतु अद्याप पर्यंत या शासन दरबारी मार्ग निघालेला नाही,

गेली 3 वर्ष झाले हातगाव, कांबी येथील शेतकरी यांनी वारंवार लेखी व तोंडी पाठपूरवा करून सुद्धा हातगाव शेती लाईट साठी वाढीव फिडर भेटत नाही. अनेक शेतकऱ्यांचे दरवर्षी लाखो रुपयाचे नुकसान होते आहे.
शेतकऱ्यांच्या तोंडा पाशी आलेला घास हे सरकार हिसकावून घेण्याच्या प्रयत्नात आहे, पाणी असून सुद्धा शेतातील पीके होरपळून चालले आहेत, एक दिवसाआड लाईट येते त्यात पण मध्ये कित्येक वेळा ये जा करते यामुळे या ठिकाणी वाढीव फिडरची आवश्यकता आहे, तरी ते लवकरात लवकर बसवण्यात यावे यासाठी हातगाव- कांबी या गावातील शेतकऱ्यांनी अनोखे आंदोलन केले
पहा विडिओ:- 👇
#शेवगाव #हातगाव #कांबी#शेतकरी #आंदोलन pic.twitter.com/7PD5N1Nwnp
— Mahalokwani (@mahalokwani) May 26, 2023
सरकार दखल घेत नाही म्हणून हातगाव मधील निलेश ढाकणे, लक्ष्मण अभंग, बद्री बर्गे या शेतकरी यांनी उगडे होऊन सरकार यांचा निषेध केला. अनेक वेळी लेखी देऊन सुद्या दखल घेतली जात नाही. जर येत्या 8 दिवसात जर काम झाले नाही तर आत्महत्या करण्याचा इशारा या शेतकरी यांनी दिला यावेळी अनेक शेतकरी तिथे उपस्थित होते