महाराष्ट्रातील विविध ग्रामपंचायतची मुदत संपून आज महाराष्ट्रातील 7721 ग्रामपंचायत मतदानाला सुरुवात झाली आहे या मतदान प्रक्रिया मध्ये सर्वच राजकीय पक्षांचे प्रतिष्ठा पणाला लागली असून गाव पातळीवरील सर्व कार्यकर्ते व युवक वर्ग यांना या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये सहभाग घेताना दिसत आहे त्यामुळेच ग्रामपंचायत निवडणुका मध्ये चांगलीच रंगत येतांना दिसत आहे
अलीकडील राजकीय घडामोडी तसेच नवीन आलेले शिंदे फडणवीस सरकार, महाविकास आघाडी यांच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आमने सामने लढत होताना दिसत आहे. गाव पातळ वरील ग्रामपंचायत निवडणूक असली तरी येणाऱ्या लोकसभा- विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष हे ग्रामपंचायत आपल्या ताब्यात कशी येईल या दृष्टीने प्रयत्न करतांना दिसत आहे,
काही ग्रामपंचायत निवडणुका या प्रतिष्ठेच्या ठरत आहेत, बरेच पक्ष आपा आपल्या परीने ग्रामपंचायत आपल्या ताब्यात राहील यासाठी प्रयत्न करीत आहेत, बरेच ठिकाणी शांततेत मतदान पार पडत आहे काही ठिकाणी बहिष्कार पण टाकलेला आहे, हे सर्व पाहता सध्याची राजकीय परिस्थिती आत्ताच महाविकास आघाडीने सरकारने काढलेला राज्यपालाविरुद्धचा मोर्चा याचा काही परिणाम ग्रामपंचायत निवडणुका होतो का हे ही, पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे
आज आज रोजी होणाऱ्या 7721 ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल दिनांक 20 डिसेंबर 2022 जाहीर होणार आहे
Previous Articleहृदयातील प्रोफेसर..!