धनराज पवार :-

जामखेड – दिनांक 28 मे रोजी शिर्डी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्यस्तरीय अधिवेशन केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी संपन्न होत आहे. रिपाइं चे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे. अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटीलउपस्थित राहणार आहेत. रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते,राज्य कार्यकारिणी उपस्थित राहणार आहेत. सुनील भाऊ साळवे रिपाइं जिल्हाध्यक्ष, बाळासाहेब शिंदे जामखेड तालुकाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यव्यापी अधिवेशनासाठी जामखेड तालुक्यात जोरदार तयारी करण्यात आली आहे. २८ तारखेला रिपब्लिकन पक्ष जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. ना रामदासजी आठवले साहेब यांचे विचार ऐकण्यासाठी युवक आणि महिला यांची लक्षणीय उपस्थिती राहील . भीमसैनिक मोठ्या संख्येने शिर्डीमध्ये शक्ती प्रदर्शन करणार असून 2024 च्या लोकसभा निवडणुकीची ही खरी नांदी ठरणार आहे.

त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या शिर्डी राज्यस्तरीय अधिवेशनास जामखेड तालुक्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन आरपीआय चे युवा नेते जामखेड तालुका कार्याध्यक्ष सतीश साळवे यांनी केले आहे केले आहे . जामखेड तालुक्यातून प्रत्येक गावनिहाय भीमसैनिक निळे झेंडे लावून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार
शिर्डी राज्यव्यापी अधिवेशन यशस्वी करण्यासाठी रिपाइं जिल्हा नेते बाबा सोनवणे, युवक तालुकाध्यक्ष देवा साळवे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला तालुकाध्यक्ष रुकसाना पठाण, , बाळासाहेब खाडे माजी सरपंच, राम साळवे ग्रामपंचायत सदस्य, किशोर ससाणे, गणेश ससाणे,बापू जावळे युवराज गायकवाड, गौरव घायतडक,छबू नाना गायकवाड, अंकुश गायकवाड , रिपब्लिकन मुस्लिम आघाडी अध्यक्ष आदम शेख, शाबीर मुलानी, सलीम सय्यद,अमीन मुलानी, अन्वर सय्यद,हनीफ मुलानी,संदीप साळवे, विश्वजीत भालेराव, रखमाजी गायकवाड,विजय गायकवाड,स्वामी धेंडे, मचिंद्र वाघ,धनंजय वाघ,सुवर्णा क्षीरसागर,विनोद जावळे, गोकुळ गायकवाड,शहाजी साळवे आर,पी,आय, कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. अशी माहिती सतीश (नाना) साळवे . रिपाइं जामखेड तालुका कार्याध्यक्ष यांनी दिली.