शेतकऱ्यांनो निसर्गाला घाबरू नका निसर्गाच्या हालचालींची वेळोवेळी माहिती देऊन मी तुम्हाला सतर्क करेन , असे प्रतिपादन प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी केले उमरखेड येथील कार्यक्रमात बोलताना सांगितले आहे.

पंजाबराव डख उमरखेड येथील स्थानिक गो सी गावंडे महाविद्यालयात दि . 26 मे रोजी दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाच्या वतिने संपन्न झालेल्या शेतकरी मार्गदर्शन व चर्चासत्र या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन करतांना ते बोलत होते .

पंजाबराव डख शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते पुढे म्हणाले की ,येत्या 10 दिवसात शेती मशागतीची कामे आटोपून घ्या , 8 जून रोजी मान्सुनचे जोरदार आगमन होणार आहे . भविष्यात यवतमाळ जिल्ह्यात दुष्काळ पडणार नाही असा विश्वास त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिला . भविष्यात शेताच्या बाजूला चर खोदून पिकांचे संरक्षण करण्याची पाळी येईल

पंजाबराव डख हे इयत्ता 8 वी मध्ये शिकत असतांना मी हवामान अंदाज वर्तविण्यास सुरुवात केली असे सांगून जि . प शाळेत अंशकालीन कर्मचारी होतो परतू अल्पशः पगारामुळे ती नोकरी सोडली व घरची 10 एकर शेती करण्यास सुरुवात केली त्यातील उत्पन्नाने मी समाधानी असल्याचे डख यांनी म्हटले आहे . भारत हा कृषी प्रधान देश आहे कोरोना काळात सर्व कंपन्या बंद पडल्या परंतु अन्न बनविणारी शेतकऱ्यांची शेती कंपनी सुरुच होती . वृक्षतोडीमुळे जंगले नष्ट होत चालल्याने निसर्ग रुसलेला आहे . त्यामुळे प्रत्येकाने झाडे लावणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी आवाहन केले .
महाराष्ट्रातील जनतेला हवामान अंदाज सांगणे सोयीस्कर व्हावे यासाठी पंजबाराव डख यांनी 250 व्हॉट्स अॅप गृप तयार करून शेतकऱ्यांना वेळोवेळी माहिती पुरविण्याचे काम सातत्याने सुरु असल्याचे त्यांनी सांगीतले . त्यासह मुंबईच्या दिशेने आलेला पाऊस हा आपल्या भागात अल्प प्रमाणात पडतो तर पुर्वेकडुन आलेला पाऊस हा समाधानकारक पडतो , पावसाने दिशा बदलल्यामुळे यंदा समाधानकारक पावसाचे भाकित त्यांनी वर्तविले .
पंजाबराव डख यांनी पावसाच्या आगमनाची चाहुल लागण्याची लक्षणे त्यांनी यावेळी सांगीतली त्यात विमानाचा आवाज , उभे वारे वाहु लागणे, चिमण्या धुळीत घोळणे , चिंचेचा बहार , आंब्यांचा बहार , बिब्याच्या झाडांचा बहार , कडूलिंबांच्या लिंबोळीचा बहार ‘ जांभळीचा बहार , सुर्य उगवतानाची अवस्था ,सुर्य मावळतांनाची अवस्था , ऑगस्ट महिन्यातील लाकडी दरवाजाचा आवाज अशी लक्षणे सोप्या भाषेत शेतकऱ्यांना त्यांनी समजाऊन सांगितली .
तर गारपिट व विजेपासून संरक्षण कसे करावे ही महत्वपूर्ण माहिती त्यांनी उपस्थित हजारो शेतकन्यांपुढे विषद केली .