पुणे जिल्हा प्रतिनिधी :- बबनराव धायतोंडे
खानवटे तालुका दौंड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी दिनांक 24 /12 /2022 रोजी आनंद बाजार आणि खाऊ गल्लीचे आयोजन केले होते कार्यक्रमाचे उद्घाटन रंगनाथ ढवळे यांनी केले या

खाऊगल्ली साठी गावातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आठवडे बाजारातील आनंद बाजार घेण्यासाठी महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता या चिमुकल्यांचे सर्व ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले गावातील चोखंदळ खवय्यांनी खाऊ गल्लीचा.मनमुराद आनंद घेतला आणि सर्व शिक्षक वृंदांचे.कौतुक केले.येथील प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी सर्व प्रकारची तरकारी पालेभाज्या वडापाव डोसा उत्तप्पा इडली चहा इत्यादींचे स्टॉल लावले होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक शाळेच्या सौ मोरे मॅडम .सौ पानसरे मॅडम.सौ भिसे मॅडम.श्री बोडरे सर श्री मेंगडे सर आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा वर्षा ढवळे.सुधिर ढवळे। यांनी विशेष प्रयत्न केले. आलेल्या . ग्रामस्थांचे वाजत गाजत स्वागत केले
या कार्यक्रमासाठी तालुका खरेदी विक्री संघाचे माजी सदस्य मच्छिंद्र आप्पा पोटफोडे तंटामुक्ती अध्यक्ष दिपक ढवळे.माजी सरपंच नंदिनी सिरसट. पोलीस हवालदार दत्तात्रय खुटाळे. माजी उपसरपंच हनुमंत पवार माजी उपसरपंच दत्तात्रय लांडगे.अंकुश माहुरकर. विलास पवार . वैभव लोखंडे अर्जुन गायकवाड मुबारक भाई शेख . हनुमंत कन्हेरकर आदी उपस्थित होते.