धनराज पवार
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या हस्ते डॉ प्रताप चौरे यांचा सत्कार
जामखेड – जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाळगाव येथे दोन दिवसांपूर्वी दुपारी जेवनाच्या सुट्टीत इ.५ वी मधील कु. अन्वी साठे ही अचानक चक्कर येऊन जमिनीवर पडली व बेशुद्ध झाली . या शाळेतील शिक्षकांनी प्रसंगावधान दाखवून त्वरीत प्राथमिक आरोग्य केंद्र हाळगांव येथे मुलीला हॉस्पिटलमध्ये नेले.
तेथील डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तीला त्वरीत जामखेडला आणून लोंढे हॉस्पीटल येथे अँडमीट केले.या हॉस्पिटल मधील डॉ. चौरे यांनी मुलीचे ह्दयाचे ठोके खुपच लो झाल्याने आाय. सी. यू मध्ये उपचार सुरू करून दोन दिवसांत बरे केले .

सदर मुलीची परस्थिती गरीबीची असल्यामुळे हाळगाव केंद्रातील शिक्षकांनी वर्गणी करून दवाखान्याचे बील भरले .तसेच येथील डॉ . चौरे यांनी माफक दरात आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली. त्यामुळे या शाळेतील शिक्षकांचे काम अभिनंदनीय व आदर्शवत असल्याचे मत जामखेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी व्यक्त केले . फसले सर , मोहळकर सर , लोंढे सर , श्रीमती हजारे मॅडम श्रीमती काळे मॅडम , मुख्याध्यापक हजारे , केंद्रप्रमुख त्र्यंबके , विस्तार अधिकारी सुनिल जाधव या सर्वांचे शिक्षक वर्गातून अभिनंदन होत आहे.

दवाखान्यात जावून धनवे व शाळेतील शिक्षकांनी येथील डॉक्टरांचा सत्कार केला .गटविकास अधिकारी प्रकाश पोळ व गट शिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे हे स्वतः दवाखान्यात जाऊन विचारपूस करून आधार दिला . त्यामुळे पालक वर्गातून आणि सर्व सामाजिक स्तरातून शिक्षक व अधिकारी यांचे अभिनंदन होत आहे.