अहमदनगर मधील राष्ट्रवादी भवन मध्ये शनिवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाची बैठक पार पडली. या बैठकीला आ. निलेश लंके Nilesh lanke हे उपस्थित होते. त्यामुळे आता आ. निलेश यांच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाला पुष्टी मिळाली असून चर्चेला उधाण आले आहे.
bank loan| तुम्हाला बँकेकडून कर्ज पाहिजे ; कर्ज लगेच मिळण्यासाठी हि कागदपत्रे जवळ ठेवा
Nilesh lanke | आमदार निलेश लंकेची तुतारी
लंके यांनी भेटीगाठी तसेच बैठका घेण्यास सुरवात केलेली पाहायला मिळत आहे. लंके Nilesh lanke यांना प्रचंड प्रतिसाद मिळतांना दिसत आहे. नगर शहरातील भाजपा मधील काही नेते सुजय विखे यांच्यावर नाराज असल्याचे चित्र पण पाहायला मिळत आहे. लोकांमध्ये अशी चर्चा आहे की, विखे हे आत्ता भाजपा मध्ये आले , आणि त्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे, भाजपा मधील काही जुने नेते आहेत त्यांना हे कुठेतरी पचलेले नाही, त्यामुळे भाजपा मधील जुनी फळी नाराज आहे अशी चर्चा दबक्या आवाजात एकायला मिळत आहे.
याचा फायदा आमदार निलेश लंके Nilesh lanke यांना होणार असे चित्र दिसत आहे, लंके यांना पाथर्डी , जामखेड , कर्जत, इतर अनेक तालुक्यातुन प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, नगर शहरातून सुद्धा चांगले मताधिक्य मिळू शकते, अनेक नाराज नेते आमदार निलेश लंके यांना छुपा पाठींबा देण्याच्या तयारीत आहेत
Table of Contents
सध्याची नगर जिल्ह्याची राजकीय परिस्थिती पाहता निलेश लंके Nilesh lanke यांचे पारडे अधिक जड होताना दिसत आहे, एक सामान्य घरातील नेता तसेच त्यांनी कोरोना काळात जी लोकांची सेवा केली आहे. अशा अनेक मुद्याचा आमदार निलेश लंके यांना नक्कीच फायदा होणार आहे, आत्ता फक्त एकच आस लोकांना लागली आहे की, आमदार निलेश लंके हातात कधी तुतारी घेतात, आणि पूर्ण नगर दक्षिणेत वाजवतात हे पाहणे महत्वाचे आहे
अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाची आज (दि.२३ मार्च) बैठक होती. लोकसभेच्या अनुशंघाने ही बैठक असल्याची माहिती मिळाली आहे. या बैठकीला आ. प्राजक्त तनपुरे, माजी आ. दादाभाऊ कळमकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी या बैठकीला आ. निलेश लंके Nilesh lanke यांनी हजेरी लावल्याने त्यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाला पुष्टी मिळत आहे. आजपर्यंत निलेश लंके यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नव्हती परंतु आता ही उपस्थिती सर्वकाही सांगून जाते