दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal यांना ईडीने अटक केली. गुरूवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर विरोधकांनी केंद्र सरकार तसेच भाजपावर आगपाखड केली. शरद पवार यांनीही या मुद्यावरून सरकारवर निशाणा साधल
bank loan| तुम्हाला बँकेकडून कर्ज पाहिजे ; कर्ज लगेच मिळण्यासाठी हि कागदपत्रे जवळ ठेवा
![](https://mahalokwani.com/wp-content/uploads/2024/03/image-25-1024x768.png)
Arvind Kejriwal| भाजपला अरविंद केजरीवाल अटक
100 कोटींच्या कथित दारुविक्री घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal यांना ईडीने अटक केली. गुरूवारी संध्याकाळच्या सुमारास ईडीची टीम 10वं समन्स आणि सर्च वॉरंट घेऊन केजरीवाल यांच्या घरी पोहोचली. दोन तासांच्या चौकशीनंतर रात्री 9च्या सुमारास अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. मात्र केजरीवालांच्या अटकेनंतर ‘आप’तर्फे जोरदार निदर्शनं करण्यात आली. इंडिया आघाडीसह विरोधी पक्षांनीही केजरीवाल यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध नोंदवला. केजरीवाल यांची अटक चुकीची आहे, असे सांगत शरद पवार यांनीही केजरीवाल यांना पाठिंबा दर्शवला.
गुरूवारी संध्याकाळी ईडीच्या कारवाईनंतर देशभरात आपच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. विरोधी पक्षांनीही केजरीवाल यांना पाठिंबा दर्शवत त्यांच्याविरोधातील कारवाईचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनीही या मुद्यावरून केंद्र सरकार आणि भाजपावर कडाडून हल्ला चढवला. शुक्रवारी सकाळी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी केजरीवालांच्या अटकेचा निषेध नोंदवला. ‘मोदींच्या भूमिकेला विरोध केल्यानेच केजरीवालांवर Arvind Kejriwal कारवाई करण्यात आली ‘ असा आरोप शरद पवार यांनी केला. भाजपला केजरीवालांच्या अटकेची किंमत मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला.
भाजपकडून सत्तेचा गैरवापर
भाजपकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. राज्याच्या काही प्रमुख नेत्यावर ईडीचा वापर करून त्यांच्यावर कारवाई केली जाते. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना लक्ष्य केलं जात आहे. ज्या राज्यात ज्या नेत्यांचा प्रभाव आहे त्यांना तुरूंगात टाकण्यात येत आहे. अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal यांना केलेली अटक चुकीची आहे. याआधी राज्यातील काही महत्त्वाच्या नेत्यांना अटक केली त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली. राज्यात धोरण ठरवणाऱ्या राज्याच्या राज्याच्या प्रमुखाला अटक करणं ही चुकीची गोष्ट आहे, असंही शरद पवार म्हणाले.
Table of Contents
भाजपला किंमत मोजावी लागेल
केजरीवाल हे दिल्लीत बसून मोदींच्या भूमिकेला विरोध करतात. त्यामुळेच त्यांच्याविरोधात ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. भाजपला केजरीवालांच्या अटकेची किंमत मोजावी लागेल, असंही शरद पवार यांनी म्हटलं.