जामखेड तालुक्यातील शिक्षकांची दिवाळी गोड झाली आहे तालुक्यातील शिक्षकांची रखडलेली कामे केली.त्यांच्या अडीअडचणी सोडविल्या.त्यामुळे माझा शिक्षक गरीबांच्या सर्वसामान्यांच्या मुलांना गुणवत्ता देणं माझं कर्तव्यच आहे. गटशिक्षणधिकारी बाळासाहेब धनवे
42 शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर
दिवाळीच्या शुभदिनी जामखेड तालुका शिक्षक समन्वय समिति व तालुक्यातील सर्व शिक्षकानी एकत्र येऊन तालुक्याचे गटशिक्षणधिकारी मा.श्री.बाळासाहेब धनवे साहेब यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित केला…
धनत्रयोदशीच्या शुभ मुहुर्तावर शिक्षकांच्या धनाचा मार्ग धनवे साहेबांनी मोकळा केला.
OTP Scam |अनोळखी व्यक्तीला ओटीपी सांगू नका, तुमचे बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसे..
या प्रसंगी बीड जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी मा श्री नागनाथ शिंदे साहेब उपस्थित होते..
श्री. बाळासाहेब धनवे जामखेड तालुक्यात हजर झाल्यापासून मेडिकल बिल, रजेचे पगार असे विविध शिक्षक हिताची कित्येक कामे जल्द गतिने करण्यात आली.नुकतेच कित्येक वर्षपासून प्रलंबीत तालुक्यातील 42 शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव साहेबांनी लक्ष घालून तातड़ीने पुर्ण केले.
Table of Contents
यामुळे शिक्षकांच्या दिवाळीच्या आनंदात भर पडली.
याचीच कृतज्ञता सर्व शिक्षक संघटना व शिक्षकांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम आयोजित केला. बाळासाहेब धनवे म्हणाले, समोर ध्येय ठेवून वाटचाल केली. ठरवलं होतं की मोठा साहेब व्हायचयं, गरीबांची, सर्वसामान्य माणसांची कामे करायची, समाजाचं भलं करायचं आणि आज ते आपल्या हातून होतांना दिसतं आहे.
सर्व शिक्षकांना बरोबर घेवून जामखेड तालुका शिक्षणाचे परिवर्तन सुरु केले आहे. त्यात यश येतांना दिसून येत आहे. हि सर्वात समाधानाची गोष्ट आहे.”
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले बीड़ जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणधिकारी श्री नागनाथ शिंदे साहेब यांनी स्पर्धा श्री धनवे साहेब यांच्या जुन्या आठवणीणा उजाळा दिला.संघर्षातून निर्माण झालेल हे व्यक्तिमत्व असून त्यांची जीवनातील वाटचाल कित्येकाना प्रेरणादायी असेल असे सांगितले.
यावेळी अनेक शिक्षकांनी आपली मनोगते यावेळी व्यक्त केली. यामध्ये शिक्षक विकास मंडळाचे विश्वस्त मुकुंदराज सातपुते, शिक्षक नेते किसन वराट,शिक्षक नेते अनिलजी अष्टेकर,गुरमाऊली सदीच्छा मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री एकनाथ(दादा) चव्हाण,गुरुमाऊली सदिच्छा मंडळ दक्षिण जिल्हा प्रमुख केशवराज कोल्हे, शिक्षक समिति जामखेड तालुकाध्यक्ष नवनाथ बहीर,महिला आघाडी च्या जिल्हा नेत्या कामिनी राजगुरु,महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा अर्चना भोसले,मा. अध्यक्ष विजय जाधव तसेच शिक्षकमित्र रजनीकांत साखरे यांनी शिक्षण व महापुरुष यांच्या प्रति असणारे सुंदर गीत गायन केले..
यावेळी सर्व संघटनाचे प्रमुख पदाधिकारी, नेते व शिक्षक मोठ्या संख्यने उपस्थित होते