राज्यातील राजकरण दिल्ली, मुंबईनंतर आता साताऱ्यातील दरेगावमधून सुरु झाले आहे. हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे eknath shinde गावी गेले आणि देशभरातील राजकारणात चर्चा सुरु झाल्या. एकनाथ शिंदे म्हणतात प्रकृती बरी नसल्याने गावी आलो तर विरोधक एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा घडवत आहे.
Personal Loan| वैयक्तिक कर्ज मिळवा सर्वात कमी व्याजदरात; कर्ज मिळविण्यासाठी 5 टिप्सचा वापर करा.!

eknath shinde| काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय
बहुमत मिळूनही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर न झाल्यामुळे जनतेमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दरेगावमधून एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यातील राजकारणाचे केंद्र दिल्ली, मुंबईनंतर आता साताऱ्यातील दरेगाव झाले आहे. एकनाथ शिंदे दरेगावमध्ये असल्याने सर्वांचे लक्ष तिकडे लागले आहे.
तुम्हाला गृहमंत्री, विधानसभा अध्यक्षपदपद हवे आहे? या प्रश्नावर एकनाथ शिंदे eknath shinde म्हणाले, याबाबत महायुतीत चर्चा होईल. त्यातून निर्णय होतील. जनतेने आमच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. आम्हाला जनतेच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच राज्यातील जनतेने महायुतीला दिलेल्या प्रेमामुळे विरोधकांना काहीच काम नसल्याने आता वेगवेगळ्या चर्चा घडवून आणत असल्याचा टोला लगावला. मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मी जनतेचा मुख्यमंत्री आहे. अडीच वर्ष मी कॉमन मॅन म्हणून मी काम केले.
Table of Contents
जनतेचे प्रश्न सोडवले. अनेक योजना आणल्या. त्याचा फायदा राज्यातील कोट्यवधी लोकांना मिळत आहे. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वात निवडणुका झाल्या. सोबत दोन्ही उपमुख्यमंत्री होते. आम्हाला प्रचंड यश मिळाले. त्यानंतर कोणताही संभ्रम नको म्हणून मागील आठवड्यात मी पत्रकार परिषद घेतली. त्यात माझी सर्व भूमिका स्पष्ट केली. मी माझा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री कोण होणार? याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह घेणार आहे.