अहमदनगर (दि २९ सप्टेंबर):-संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या नृत्याने घायाळ करणाऱ्या गौतमी पाटील Gautami Patil हिला अहमदनगर जो गणपती विसर्जनाच्या दिवशी कार्यक्रम घेतला आहे, तो चांगलाच महागात पडणार आहे, पोलिसांनी गौतमीच्या या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती, तरी पण आयोजक आणि गौतमी पाटील यांनी हा कार्यक्रम पार पाडला , या कार्यक्रमध्ये वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार होता , कारण हा कार्यक्रम रस्त्यावर आयोजित करण्यात आलेला होता .
Gautami Patil गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल
[better-ads type=’banner’ banner=’5978′ ]
गौतमीच्या पाटील Gautami Patil कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होत असते, आणि कर्यक्रमात पण तेच पाहायला मिळाले गर्दी इतकी झाली होती कि एक गाडी रस्त्यावरून निघण्यासाठी ३० ते ४० मिनिटे लागत होते. यामुळे आधीच पोलिसांनी या कार्यक्रमला परवानगी दिली नव्हती, परंतु पोलिसांच्या या नोटीसीला आयोजकांनी आणि गौतमी हिने केराची टोपली दाखवली आणि कार्यक्रम हा नियोजित कार्यक्रम पार पाडला
नृत्यांगना गौतमी पाटील Gautami Patil व तिचा सहकारी मॅनेजर यांच्यावर अहमदनगर मधील तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल Case करण्यात आला असून रस्त्यावर मंडप टाकून रहदारीस अडथळा होईल अशा प्रकारे नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रम घेतल्याबद्दल आयोजक गणपती मंडळाच्या अध्यक्षांवर ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर शहरातील पाईपलाईन रोडवर २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी मृत्युंजय प्रतिष्ठान गुलमोहर रोड आणि एकदंत मित्र मंडळ यांच्या वतीने गौतमी पाटील हीचा नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.यावेळी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमास प्रशासनाने परवानगी नाकारली होती.
मात्र तरीही हा कार्यक्रम झाल्यामुळे पोलिसांनी आता गौतमी पाटील, Gautami Patil तिचा स्वीय सहाय्यक अशोक खरात आणि कार्यक्रमाचे आयोजक असलेले मृत्युंजय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल सांगळे,आनंद कैलास नाकाडे,हर्षल किशोर भागवत,यांच्यावर तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये रस्त्यात अडथळा निर्माण होईल असा कार्यक्रम घेणे तसेच सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी क्षेपकाबाबत घालून दिलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघन करून डीजे सिस्टीम लावून कर्णकर्कश आवाजामध्ये गाणी लावून मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण करणे, वारंवार आवाज कमी करण्याच्या सूचना देऊनही सूचनांकडे दुर्लक्ष करणे या कारणांसाठी भादवीक १८८,२८३,३४१, ३४ सह पर्यावरण संरक्षण अधिनियम१९८६ चे कलम २, १५ व ध्वनी प्रदुषण अधिनियम २००० चे कलम ३,४,५,६,मु.पो.का.क ३७ (१) (३)/१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.