Jamkhed जामखेड तालुक्यातील सारोळा येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.
धनराज पवार

Jamkhed जामखेड तालुक्यातील जि.प.प्रा.सारोळा शाळेत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना बालपणापासून पर्यावरणाचे धडे मिळावे,विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व समजावे व विद्यार्थी आपल्या भावी जीवनात वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करावे सदर हेतू समोर ठेवून शाळेमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला

.Reliance। मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी उतरणार, डिजिटल फायनान्समध्ये करणार धमाल..

या वेळी शालेय विद्यार्थ्यांनी वाजत-गाजत वृक्षदिंडी काढून झाडे लावा,झाडे जगवा हा संदेश दिला.गावातील प्रमुख मार्गावरुन ही दिंडी काढुन शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.लावलेल्या झाडांची योग्य काळजी व देखभाल करुन त्यांचे संवर्धन करु अशी प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी घेतली.
Table of Contents
अलीकडे होत असलेल्या पर्यावरणाचा ऱ्हास मानवासाठी अत्यंत घातक ठरत आहे, परिणामी आपल्याला नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो म्हणून आपण पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्ष लागवड करावी असे मत सारोळा गावाचे सरपंच श्री.अजय काशिद यांनी व्यक्त केले.तसेच वृक्षारोपणासाठी 50 पेक्षा जास्त झाडे उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री.भीमराव सांगळे साहेब यांचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमासाठी सरपंच श्री.अजय काशिद,माजी सरपंच श्री.हरिभाऊ खवळे,सदाशिव काशिद, गणेश हगवणे,संतोष खवळे,संदिपान गीते, निलेश थोरात, किरण काळे व पालक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीरित्या राबवण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक शहाजी जगताप,माजीद शेख,खंडेराव सोळंके,प्रशांत होळकर,अभिमान घोडस्वार,शबाना शेख व अमृता रसाळ यांचे सहकार्य लाभले.

सदर वृक्षारोपण कार्यक्रम उत्कृष्टपणे राबवण्यासाठी जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आदरणीय श्री.प्रकाश पोळ साहेब व गटशिक्षणाधिकारी श्री.बाळासाहेब धनवे साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
