समाजाला एक धर्मग्रंथ असतो परंतु माझा ग्रंथ भारतीय संविधान आहे. – गटविकास अधिकारी प्रकाश पोळ
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
दिनांक 29 एप्रिल 2023 रोजी ग्रामीण विकास केंद्र जामखेड(jamkhed) आणि संविधान प्रचारक व जामखेड पंचायत समितीच्या सहकार्याने पंचायत समितीच्या सभागृहात गट विकास अधिकारी मा. प्रकाश पोळ यांच्या अध्यक्षतेखाली आज एक दिवशीय कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपले भविष्य भारतीय संविधान या पुस्तकाचे लेखक सुभाष वारे सर उपस्थित होते. सोबतच संविधान साक्षरता या पुस्तकाचे लेखक नागेश जाधव ही उपस्थित होते.

स्वातंत्र्यापूर्वी सरकारला शेतसारा भरणाऱ्या 22 टक्के व्यक्तींनाच मतदानाचा हक्क होता. 28 वर्षे इंग्लंडचा महिलांना मतदानासाठी लढावं लागलं आपल्याला मात्र 26 नोव्हेंबर 1950 पासून काहीही न करता मतदानाचा अधिकार मिळाला. धर्मशास्त्रानुसार बाईला शिकवन हे पाप होतं म्हणून सावित्रीबाई फुले यांच्यावर सेण टाकले. पूर्वी दुसऱ्या गावी जाताना त्या त्या गावातील पोलीस पाटील त्यांना तशी वर्दी लागत असे. परंतु आज आपल्याला भारतीय संविधानामुळे संचार स्वातंत्र्य मिळाले आहे.धन्यदांडग्यांची प्रतिष्ठा संविधानामुळे गेली त्यामुळे त्यांना संविधान मान्य नाही.संविधानाने आपल्याला दोन प्रकारचे अधिकार दिले त्यापैकी मूलभूत अधिकार म्हणजे झालंच पाहिजे आणि मार्गदर्शक तत्वे यात प्रयत्न करायचे असतात असे बोलताना वारे सर म्हणाले.
हे नक्की वाचा : पंजाबराव डख यांचे मान्सून संदर्भात मोठे भाकीत; या दिवशी होणार मान्सून महाराष्ट्रात दाखल.! पहा आणखी काय म्हटले
समाजाला एक धर्मग्रंथ असतो परंतु माझा ग्रंथ भारतीय संविधान आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका प्रबंधावर रिझर्व बॅंकेची स्थापना झाली असे जामखेड (jamkhed) पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रकाश पोळ बोलत होते.
जेव्हापासून मानव जात जन्माला आली तेव्हापासून ज्यांनी ज्यांनी समाज परिवर्तनाच काम केलं ज्यांनी ज्यांनी हा देश घडवण्यासाठी त्याग केला संघर्ष केला बलिदान दिले आयुष्य अर्पण केले अशा सर्व समाजसेवकांचे समाज सुधारकांचे क्रांतीकारकांच्या विचारांचे त्यागाचं एकत्रित गाठुड बांधून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहिण्याचे काम केले असे बोलताना ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. डॉ. अरुण जाधव म्हणाले.
या कार्यशाळेसाठी सुभाष आबा वारे पुणे, प्रकाश पोळ बी डी ओ जामखेड, नागेश जाधव कोरो इंडिया मुंबई,
ॲड. डॉ. अरुण जाधव भ. वि. कल्याण समिती महाराष्ट्र शासन सदस्य, संदीप कुंभार एम ट्रस्ट अहमदनगर, यांनी मनोगत व्यक्त केली. प्रास्ताविक बापू ओहोळ यांनी केले. यावेळी बापूसाहेब माने विस्ताराधिकारी जामखेड, (jamkhed) सिध्दनाथ भजनावळे, युवराज पाटील, तांबोळी आदी जामखेड तालुक्यातील सरपंच ग्रामसेवक यांनी उपस्थिती लावली. सर्व संविधान प्रचारक टीम माय लेकरू टीम निवारा टीम यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चव्हाण यांनी केले तर आभार शितल काळे यांनी मानले. या कार्यशाळेत संविधान प्रचारक म्हणून विविध गावात संविधानाची जनजागृती करणारे संविधान प्रचारक विशाल पवार, गणपत कराळे, दिपाली काळे, तुकाराम पवार, नंदकुमार गाडे सर, ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे प्रकल्प समन्वयक सचिन भिंगारदिवे, निवारा प्रकल्पाचे वैजिनाथ केसकर, ,सोशल मीडियाचे प्रमुख राजू शिंदे, अनाथ निराधार मुलांना त्यांचे हक्कआधिकार मिळवून देणारे अतुल ढोणे, ऋषिकेश गायकवाड, श्रीगोंदा तालुक्याचे समन्वयक संतोष भोसले हे कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे समन्वयक संतोष भोसले यांनी दिली.