जामखेडमध्ये महात्मा बसवेश्वर व संत तुकडोजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
जामखेड प्रतिनिधी l महात्मा बसवेश्वर यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी समर्पित केले असून, त्यांनी सामाजिक क्रांती घडवून सर्वसामान्यांना दिलासा दिला. त्यांच्या कार्याचा प्रभाव महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर जाणवतो, असे प्रतिपादन तहसीलदार गणेश माळी यांनी केले.
new car |अक्षय तृतीयेनिमित्त चारचाकी वाहनांवर खास ऑफर्स; कोणत्या गाडीवर किती डिस्काउंट
लिंगायत वाणी समाजाच्या वतीने आज रोजी शहरात जगतज्योती महात्मा बसवेश्वर व संत तुकडोजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले.
पुढे बोलताना तहसीलदार गणेश माळी म्हणाले की, संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून समाजाला जागृत केले. त्यांनी आत्मनिर्भरतेवर भर देत प्रत्येकाने स्वतःच्या पायावर उभे राहावे, जीवनात कौशल्य आणि कार्याला महत्त्व द्यावे, असा संदेश दिला.
यावेळी मुख्याधिकारी अजय साळवे, बजरंग सरडे, आकाश बाफना आदींनी मनोगत व्यक्त केले.
जामखेड तहसील कार्यालय आणि नगर परिषद येथेही या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम घेण्यात आले. तहसीलदार गणेश माळी आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी महात्मा बसवेश्वर व संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमासाठी वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष बजरंग सरडे, उपाध्यक्ष राहुल लोहकरे, अनिल लोखंडे, जगदीश मेनकुदळे,युवा नेते अमोल लोहकरे,सुनील ओझर्डे, अनिल लोहकरे, शिवकुमार डोंगरे, महेश कस्तुरे,गणेश गवसने, महेश नगरे, प्रहार जनशक्ती पक्षाचे नय्युमभाई सुभेदार,उद्योजक आकाश बाफना,विठ्ठल परांडकर, अमृत डोंगरे, अमरनाथ डोंगरे, विजय डोंगरे, आनंद लोहकरे आदी लिंगायत वाणी समाजातील युवक व नगरपरिषदेचे कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जयंतीनिमित्त समाजप्रबोधनाचे संदेश देणारे विचार मांडण्यात आले आणि महापुरुषांच्या कार्याचा गौरव करण्यात आला