Manoj Jarange | जरांगे पाटलांचा मोठा डाव; कर्जत-जामखेडमध्ये मा. नगराध्यक्ष विकास राळेभात विधानसभेच्या मैदानात
कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीत मोठी रंगत येणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रोहित पवार यांचे एक निकटवर्तीय तसेच जामखेडचे मा. नगराध्यक्ष विकास राळेभात विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत, त्यांनी सोमवार दिनांक २८ ऑक्टो २०२४ रोजी आपल्या अनेक मराठा कार्यकर्त्यांसमवेत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
विकास राळेभात यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला नाही, येणाऱ्या विधानसभेत चित्र बदलेले पाहायला मिळू शकते, कारण राज्यभरात जरांगे पाटील Manoj Jarange फॅक्टर सध्या जोरात चालत आहे, आणि विकास राळेभात यांचा कर्जत- जामखेड मध्ये मोठा जनसंपर्क आहे, त्यांना मानणारा मोठा युवक वर्ग या दोन्ही तालुक्यात आहे
Manoj Jarange | जरांगे पाटलांचा मोठा डाव; कर्जत-जामखेडमध्ये मा. नगराध्यक्ष विकास राळेभात
आता हे पाहणे महत्वाचे असणार आहे कि, जरांगे पाटील हे कर्जत – जामखेड साठी कोणता निर्णय घेतात, उमेदवारी कायम ठेवतात कि माघारी घेतात जर उमेदवारी कायम ठेवली तर याचा फटाक राम शिंदे कि रोहित पवार यांना बसणार हे लवकरच समजणार आहे
Table of Contents
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे, आज निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता यावेळी महाविकास आघाडीविरोधात महायुती असाच सामना रंगण्याची शक्यता आहे. मात्र आता या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील उडी घेतली आहे. मनोज जरांगे हे देखील काही विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्यानं महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. येत्या 31 तारखेला मराठा, मुस्लिम व दलित समीकरण जुळवण्यासाठी महत्त्वपूर्ण फायनल बैठक होणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?
मराठा, दलित व मुस्लिम समीकरण जुळवण्यासाठी काही धर्मगुरू लांबून येणार आहेत. त्यांना हेलिकॉप्टरची उद्याची परवानगी मिळाली नाही. काल रात्री सगळ्यांचे प्रतिनिधी आले होते, मराठा मुस्लिम आणि दलितांचे प्रतिनिधी दोन दिवसांपासून हेलिकॉप्टरची परवानगी घेत आहेत. त्यांना उद्याची परवानगी मिळाली नाही, त्यामुळे आता फायनल बैठक 31 तारखेला होणार असून, समाज बांधवांना माझी पुन्हा पुन्हा विनंती आहे की, 31 तारखेला इकडे कोणीही येऊ नका, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.