अहिल्यानगर (दि.१५ जानेवारी):-मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक,युवतींना कायम स्वरूपी सेवेत घेण्याची मागणी राहाता तालुक्यातील प्रशिक्षणार्थी युवक, युवतींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
![](https://mahalokwani.com/wp-content/uploads/2025/01/e2e92553-f448-4059-927a-f6d90be6fafa-1024x461.jpeg)
प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील त्यांना तिथेच कायमस्वरुपी करु असे प्रचार सभेत माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व माजी कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभातजी लोढा यांनी म्हटले आहे.सहा महिन्याचे यशस्वी प्रशिक्षण झाल्यानंतर आम्हाला कायमस्वरुपी रोजगार,स्वयंरोजगार, उपलब्ध करुन दयावा, त्यानुसार प्रशिक्षणार्थीला कायमस्वरुपी करण्यात यावे.युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थीना किमान वेतन कायद्यानुसार किमान २०,०००/- वेतन/मानधन देण्यात यावे,नियमानुसार काम आणि दरमहा किमान पाच तारखेच्या आत विद्यावेतन मिळाले पाहिजे.
काम करुनही दप्तर दिरंगाईमुळे विद्यावेतन मिळत नसेल तेंव्हा दिरंगाई करण्याऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करावी.शासकीय आणि निमशासकीय नोकरांना प्रासंगिक रजा,वैद्यकीय रजा आहेत त्या आम्हालाही लागू करण्यात यावे.तसेच वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या परिक्षा भरती प्रकीयेमध्ये प्रशिक्षणार्थीसाठी १०% राखीव जागा ठेवाव्यात अशा विविध मागण्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक,युवतींना निवेदनाद्वारे केल्या आहेत.