फिर्याद स्वराज नारायण सरदार, वय 17 वर्षे, धंदा शिक्षण, रा. न्यू मॉर्डन कॉलनी, फुंदे हॉस्पिटल मागे, बोल्हेगाव, अहिल्यानगरसमक्ष पोलिस police स्टेशन येथे हजर होवुन फिर्याद देतो की, मी माझ्या घरी माझी आई- जयश्री वडील नारायण व बहिण हिंदवी असे एकत्र राहण्यास असुन माझे वडील कंपनीत खाजगी नोकरी करुन आमचे कुटुंबाचे उदरनिर्वाह करतात.
police | तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत एका शाळकरी मुलाच्या डोक्यात दगड
पहा व्हिडिओ
मी सध्या न्यानतीर्थ कॉलेज, सोलापुर रोड, ता जि अहिल्यानगर येथे 12 वी मध्ये शिक्षण घेत आहे. तसेच मी, चेतन मतकर व प्रशांत पवार असे तिघेजण रोज पाईपलाईन रोडवरील क्लासला सोबत जातो व क्लास सुटल्यावर आम्ही सर्व सोबत प्रशांत पवार याला घरापर्यंत भिंगारदिवे मळा, गुलमोहर रोड, सावेडी अहिल्यानगर येथे सोडविण्याकरीता दि. 09/04/2025 रोजी सकाळी 10/30 वा चे सुमारास कराळे क्लास सुटल्यानंतर मी, चेतन मतकर व प्रशांत पवार असे तिघेजण त्याचे घरी जाण्यासाठी निघालो.
थोड्या वेळाने सकाळी 10/45 वा चे सुमारास आम्ही प्रशांत याचे घराजवळ भिंगारदिवे मळा, गुलमोहर रोड, सावेडी येथे आलो. तेथे आल्यावर आम्ही प्रशांत याचे घराजवळ येवून रस्त्याचे कडेला थांबलो होतो. आम्ही तेथे थांबलेलो असताना आमच्या समोरुन एक अनोळखी इसमने त्याचे ताब्यातील मोटारसायकल भरधाव वेगात चालवत आम्हाला समोरुन धडक दिली. त्यानंतर धडक दिलेल्या इसमाने ” तुम्हाला रस्त्याचे कडेला थांबता येत नाही का ?” असे म्हणुन आम्हाला वाईट वाईट शिविगाळ करु लागला. तेव्हा मित्र चेतन हा त्याला ” आम्ही रस्त्याचे कडेलाच उभे होतो.
Table of Contents
आम्ही येथुन जातो. ” असे म्हणाला. त्याचा त्याला राग येवुन त्याने त्याचे हातातील कडं आम्हाला मारण्याकरीता काढले. आमचे भांडण चालु असताना त्याचवेळी एक मुलगा student तेथे आला. तो तेथे आल्यावर धडक देणाऱ्या इसमाने त्याला ” ही मुले मला धमकी देवुन मारहाण करत आहेत, मला दम देत आहे” असे सांगितले. त्यामुळे तेथे आलेल्या मुलाने आम्हाला वाईट वाईट शिविगाळ करुन तेथेच रस्त्यावर पडलेला दगड हातात घेवुन माझ्या डोक्यात मारला. मला त्याने डोक्यात दगड crime लागल्याने मी जखमी होवुन खाली पडलो.
त्यानंतर आमचे भांडण चालु असताना तेथे लोक जमा झाले व त्यांनी आमचे भांडण सोडविले. त्यानंतर ते तेथुन जाताना त्यांनी मला ” तुम्ही परत या जागेवर यायचे नाही, परत आलात तर हातपाय तोडुन टाकेन” अशी धमकी दिली व ते तेथुन निघुन गेले. त्यानंतर तेथे जमा झालेल्या लोकांपैकी एका इसमाला माझ्या डोक्यात दगड मारणाऱ्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव रोहीत चाबुकस्वार असे असल्याचे सांगितले व मोटारसायकल चालवुन आम्हाला धडक देणारा इसम हा रोहीत याचे वडील असल्याचे सांगितले.
त्यानंतर मला मारहाण झाल्याबाबत मी माझे वडीलांना फोन करुन सांगितले व आम्ही त्यांचेविरुध्द तक्रार देण्यासाठी तोफखाना पोलीस स्टेशनला आलो असता पोलीसांनी मला औषधोपचारकामी दवाखाना यादी दिली. त्यानंतर मी सिव्हील हॉस्पीटल अहमदनगर येथे जावुन औषधोपचार करुन आज रोजी पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी आलो आहे.

तरी दिनांक 09/04/2025 रोजी सकाळी 10/45 वाचे सुमारास 1) रोहीत चाबुकस्वार 2) रोहीत याचे वडील ( पत्ता माहिती नाही) अशांनी मी मित्र चेतन मतकर व प्रशांत पवार असे रस्त्याचे कडेला उभे असताना रोहीत याच्या वडीलांनी आम्हाला त्याचे मोटारसायकलने धडक देवुन आम्हाला वाईट वाईट शिविगाळ केली व आमचे भांडण चालु असताना त्यांचा मुलगा रोहीत चाबुकस्वार हा तेथे येवुन त्याने आम्हाला वाईट वाईट शिविगाळ करुन तेथेच रस्त्यावर पडलेला दगड हातात घेवुन माझ्या डोक्यात मारला व मला जखमी केले व जाताना तुम्ही परत या जागेवर यायचे नाही, परत आलात तर हातपाय तोडुन टाकेन” अशी धमकी दिली आहे म्हणुन माझी त्याचेविरुध्द तक्रार आहे.