Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
mahalokwani
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
mahalokwani
Home » जामखेड » Ram shinde| पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयात सभागृह इमारतीसाठी १४ कोटी ३२ लाख रूपये मंजूर – सभापती प्रा.राम शिंदे
जामखेड

Ram shinde| पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयात सभागृह इमारतीसाठी १४ कोटी ३२ लाख रूपये मंजूर – सभापती प्रा.राम शिंदे

mahalokwaniBy mahalokwaniMay 5, 2025Updated:May 5, 2025No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड : जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयात सभागृह इमारत व्हावी याकरिता विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे हाती घेतलेल्या पाठपुराव्यास मोठे यश आले आहे. राज्य सरकारने कृषि महाविद्यालय परिसरात सभागृह इमारत उभारण्यास मंजुरी दिली आहे. त्यासाठी १४ कोटी ३२ लाख ८९ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांची गैरसोय दुर होण्यास मदत होणार आहे. चोंडीत ६ मे रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी प्रा राम शिंदे यांनी जामखेडकरांसाठी मोठे गिफ्ट दिले आहे.

hsc result 2025 | राज्यात यंदा बारावीच्या’ निकालाची टक्केवारी घसरली; यांनी मारली बाजी

विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे हे २०१४ ते २०१९ या काळात राज्य सरकारमध्ये मंत्री असताना जामखेड तालुक्यातील हळगाव येथील १०० एकर परिसरात अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिले शासकीय कृषि महाविद्यालय २३/०१/२०१८ रोजी स्थापन करण्यात आले होते. हे महाविद्यालय महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत आहे. प्रा राम शिंदे यांच्या पुढाकारातून कोट्यावधी रूपये खर्चून हळगाव कृषि महाविद्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे.

या महाविद्यालयात राज्यभरातील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सदर कृषि महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारती, वसतीगृह इमारती, निवासी इमारती, सुविधा इमारत व ग्रंथालय इमारत इत्यादी इमारतींचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. परंतू सभागृह इमारत नसल्याने महाविद्यालयाचे विविध शैक्षणिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांकरीता विविध व्याख्याने, विविध चर्चासत्रे, कार्यशाळा घेण्यात अडचणी येत होत्या.

ही बाब विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे याच्या लक्षात आल्यानंतर शिंदे यांनी हळगाव कृषि महाविद्यालय परिसरात सभागृह इमारत उभारण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा हाती घेतला होता. त्यानुसार संचालक (विस्तार व शिक्षण), महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी कृषि महाविद्यालय, हाळगाव करिता सभागृह इमारत बांधकामाचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी ७ मार्च २०२४ रोजी सादर केला होता. त्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाशिक विभागाचे मुख्य अभियंता यांनी तांत्रिक मान्यता प्रदान केली होती. या अंदाजपत्रकात बदल करून शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयाच्या सभागृह इमारत उभारण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी सुमारे १४ कोटी ३२ लाख ८९ हजार रूपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज ५ मे रोजी कृषि, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने जारी केला आहे.

प्रा राम शिंदे, सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद

हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महाविद्यालय परिसरात दर्जेदार मुलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी माझा पाठपुरावा सुरु आहे. महाविद्यालयात सभागृह इमारत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. ती दुर करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला होता. सरकारने यासाठी १४ कोटी ३२ लाख ८९ हजार रूपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. सभागृह निर्माण होणार असल्याने विद्यार्थ्यांची दुर होण्यास मदत होणार आहे. सरकारने कृषि महाविद्यालयासाठी १४ कोटी रूपयांचा निधी मंजुर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषि मंत्री माणिकराव कोकाटे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मनापासून आभार !

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articlehsc result 2025 | राज्यात यंदा बारावीच्या’ निकालाची टक्केवारी घसरली; यांनी मारली बाजी
Next Article supriya sule | या प्रकरणात पोलिसांवर कारवाई करा, सुप्रिया सुळे यांची मागणी
mahalokwani
  • Website

Related Posts

पाडळी जि.प.शाळा ( पवारवस्ती) चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

April 16, 2025

Jamkhed| जामखेडमध्ये शिव, फुले, आंबेडकरांच्या संयुक्त जयंतीनिमित्त राज्यातील मान्यवर नेत्यांची भव्य उपस्थिती

April 15, 2025

जामखेडमध्ये आंबेडकर जयंती शिस्तबद्ध आणि शांततेत साजरी करावी – पोलीस निरीक्षकांचा संदेश

April 12, 2025

ladki bahin hapta | लाडक्या बहिणींनासाठी खुशखबर; जुलै महिन्याचे पैसे या दिवशी मिळणार!

vidhan bhavan| भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी.आश्चर्य नको

Tesla Model Y| मुंबईत Tesla चं भारतातील पहिलं एक्सपीरियन्स सेंटर ; हे आहेत बेस्ट फीचर्स

tukda bandi | काय आहे तुकडाबंदी कायद्या 50 लाख नागरिकांना जमिनीची मालकी मिळणार; जाणून घ्या

nagar-pune | नगरकरांचे स्वप्न पूर्ण होणार; खासदार निलेश लंके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

Splendor बाईकवर जबरदस्त ऑफर! EMI फक्त ₹2225 पासून!”

sangram jagtap | अहिल्यानगरमध्ये खळबळ आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी

coaching classes | डोळ्यात मिरचीची पूड टाकून मुलीवर अत्याचार; नेमकं काय घडलं?

new car| कार घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार; 10 लाखांपेक्षा स्वस्त कार लवकरच लाँच होणार, जाणून घ्या

© 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.