अहिल्यानगर (दि.४ प्रतिनिधी):शिर्डी येथील दुहेरी हत्याकांडातील दोन्ही आरोपीना जेरबंद करन्यात स्थानिक गुन्हे शाखा व शिर्डी Shirdi Crime पोलीसाना यश आले आहे.बातमीची हकिगत अशी की,दि.03 फेब्रूवारी 2025 रोजी पहाटेच्या सुमारास साईबाबा संस्थान शिर्डी येथे डयुटीस जात असलेले 1)सुभाष साहेबराव घोडे वय 45 वर्षे,रा. खंडोबानगर,शिर्डी,ता.राहाता, जि.अहिल्यानगर यांना खंडोबानगर चौफुली येथे व 2) नितीन कृष्णा शेजुळ वय 44 वर्षे, रा. साई पार्क अपार्टमेंट, साकुरी शिव, राहाता, ता.राहाता, जि. अहिल्यानगर
या ठिकाणी कोणीतरी अज्ञात इसमांनी लुटमार करण्याचे उद्देशाने अडवुन कोणत्यातरी हत्याराने भोसकुन व मारहाण करुन जिवे ठार मारले आहे. तसेच 3) कृष्णा बाबाराव दहेरकर वय 68 वर्षे, रा. श्रीकृष्णनगर, नांदुर्खी रोड, शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर यांना दोन अज्ञात इसमांनी येवुन त्यांचे मोटारसायकलला लाथ मारुन खाली पाडुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने चाकुने पोटात भोसकुन व उजवे कानावर तसेच उजव्या हाताचे मनगटावर वार करुन त्यांचे खिशातील पैसे व मोबाईल हिसकावुन घेवुन पळुन गेले होते. वरील घटनेबाबत अनुक्रमे 1) शिर्डी पोलीस ठाणे गु.र.नं. 53/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103 (1), 126, 309 (6), 311, 312 आर्म ऍ़क्ट 4/25 प्रमाणे, 2) राहाता पोलीस ठाणे गु.र.नं. 54/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103 (1), 126(2), 309 (6), 311, 312 आर्म ऍ़क्ट 4/25 प्रमाणे, 3) शिर्डी पोलीस ठाणे 54/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109, 311, 312, 3(5), आर्म ऍ़क्ट 4/25 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.शिर्डी येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ श्री. राकेश ओला पोलीस अधिक्षक अहिल्यानगर व श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर,शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग शिर्डी, यांनी तात्काळ घटना ठिकाणी भेट देऊन,आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणणेबाबत शिर्डी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना तपास पथके तयार करणेबाबत आदेश दिले.
Shirdi Crime|शिर्डी दुहेरी खुनातील आरोपी जेरबंद;
नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री.दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/ हेमंत थोरात, पोउपनि/तुषार धाकराव, व पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, संतोष लोढे,ऱ्हदय घोडके,सुरेश माळी,गणेश भिंगारदे,प्रमोद जाधव,किशोर शिरसाठ,बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव,रमिझराजा आतार,फुरकान शेख,प्रशांत राठोड,अर्जुन बडे,उमाकांत गावडे,अरुण मोरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शिर्डी विभाग शिर्डी येथील पोलीस अंमलदार इरफान शेख व अशोक शिंदे अशांचे पथक नेमुण गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले.दि.03 फेब्रूवारी 2025 रोजीपासुन शिर्डी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हा घडले ठिकाणी भेटी देवुन गुन्हा ठिकाणचे आजुबाजुचे सी. सी. टी. व्ही.फुटेज चेक करुन संशयीतांची नावे निष्पन्न केली.त्यापैकी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आरोपी नामे 1) किरण ज्ञानदेव सदाफुले वय 30 वर्षे, रा. श्रीरामनगर, शिर्डी, ता.राहाता यास अटक करुन त्याची 07 दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे.सदर गुन्ह्यातील मुख्य Shirdi Crime आरोपी हा गुन्हा घडले पासुन फरार झालेला होता.
Table of Contents
फरार आरोपी शाक्या माळी रा.शिर्डी, ता. राहाता याचा पोलीस पथके शोध घेत असतांना गुप्त बातमीदारामार्फत सदरचा आरोपी हा देशमुख चारी येथील काटवनात लपुन बसला असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने देशमुख चारी परिसरातील काटनास चोहोबाजुने वेढा घालुन आरोपीचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेण्यात आले.ताब्यात घेतलेल्या आरोपीस त्याचे पुर्ण नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव राजु उर्फ शाक्या अशोक माळी वय 29 वर्षे, रा. गणेशवाडी, शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.ताब्यातील आरोपीकडे वर नमुद तीनही गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्याने सदरचे गुन्हे लुटमार करण्याचे उद्देशाने किरण ज्ञानदेव सदाफुले याचे साथीने केलेबाबत माहिती सांगितली आहे.
ताब्यात घेण्यात आलेला आरोपी नामे राजु उर्फ शाक्या अशोक माळी वय 29 वर्षे, रा. गणेशवाडी, शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर यास शिर्डी पोलीस ठाणे गु.र.नं. 53/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103 (1), 126, 309 (6), 311, 312 आर्म ऍ़क्ट 4/25 प्रमाणे गुन्ह्याचे तपासकामी शिर्डी पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले असुन पुढील तपास शिर्डी पोलीस ठाणे हे करीत आहे.
सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री. वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर,श्री.शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी,शिर्डी उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.