भारताने पाकिस्तानातील अनेक दहशतवादी तळांना उद्धवस्त करण्यात आले आहे. भारताकडून करण्यात आलेल्या या एअर स्ट्राईकला ऑपरेशन सिंदूर Sindoor असे नाव देण्यात आले आहे. आता यावर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
Sindoor वर शरद पवार, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
Sindoor जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला होता. आता अखेर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत पाकड्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानातील ९ ठिकाणी एअर स्ट्राईक केला आहे. या हल्ल्यात भारताने पाकिस्तानातील अनेक दहशतवादी तळांना उद्धवस्त करण्यात आले आहे. भारताकडून करण्यात आलेल्या या एअर स्ट्राईकला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले आहे. आता यावर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

नुकतंच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ट्वीट करत भारतीय सैन्य दलाचे कौतुक केले आहे. “आपल्या छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यदलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे. आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला.

Table of Contents
या कारवाईत पाकिस्तानी नागरिक किंवा पाक लष्कराच्या कोणत्याही ठिकाणाला धक्का न लावता, अतिरेक्यांच्या नऊ लक्ष्यांवर अचूक आणि नियोजित हल्ला करण्यात आला. भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. भारताचे सार्वभौमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखणाऱ्या तसेच पहलगाम हल्ल्याचा योग्य प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व भारतीय जवानांचे मन:पूर्वक अभिनंदन! जय हिंद!”, असे शरद पवारांनी म्हटले आहे.