आय एम एस चा मतदार जागृती उपक्रम
जास्तीत जास्त युवकांनी मतदार नोंदणी करून निवडणुकीची पहिली पायरी सर केली पाहिजे असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, निवडणूक विभाग अहमदनगर यांनी केले.
मतदार नोंदणीची टक्केवारी वाढीसाठी निवडणूक आयोगाच्या वतीने नगर जिल्ह्यातील कॉलेजमध्ये मतदार जागृती अभियान सुरु असून मुलांना मतदार नोंदणी साठी प्रेरित केले जात आहे अशाच प्रकारचा कार्यक्रम आय एम एस या व्यवस्थापन संस्थेत घेण्यात आला यावेळी ते बोलत होते.
यावेळी सुधीर पाटील, तहसीलदार निवडणूक शाखा, संगणक विभाग प्रमुख डॉ उदय नगरकर, व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ प्रोनोती तेलोरे, अभ्यासक्रमाचे समन्वयक प्रा सय्यद मुदस्सर, वर्थशिप अर्थ फौंडेशनचे अहमदनगर जिल्हा समन्वयक कांबळे, साक्षी भालेराव, विद्यार्थी उपस्थित होते.
राहुल पाटील यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना मतदार नोंदणीचे फायदे, त्याची अंमलबजावणी, त्याच बरोबर एक नागरिक म्हणून जबाबदारी या गोष्टीविषयी भाष्य केले. तर सुधीर पाटील यांनी आपल्या भाषणात १८ ते २१ या वयोगटातील मुलांची मतदार नांव नोंदणीतील सहभाग, त्याची टक्केवारी, त्याचप्रमाणे नांव नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे, त्याचे संकेतस्थळ, त्यासाठी आवश्यक असणारे फॉर्म ऑनलाईन कसे भरायचे याविषयी सविस्तर माहिती दिली.
संस्थेच्या वतीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे व पुढील काही दिवसात सर्व विद्यार्थ्यांची नांव नोंदणी करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. त्याच प्रमाणे निवडणूक आयोगाच्या उपक्रमात सहभागी होणार असल्याचेही सांगण्यात आले. कार्यक्रम यशस्विते साठी आय एम एस प्रा विजय शिंदे यांच्यासह संध्या देवकर, वृषाली शिंदे, निकिता पंतंगे व समृद्धी शहाणे या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.