नगरसेवक भाऊंनो वार्डात लक्ष द्या;
नगरसेवक भाऊंनो वार्डात लक्ष द्या; नाहीतर जनता याच खड्यात पाडेल अशी म्हणण्याची वेळ आली म्हणावे लागेल, कारणहि तसेच आहे, सद्या पावसाचे दिवस आहेत, त्यामुळे नगरसेवक भाऊंनो वार्डात लक्ष द्या कारण वार्डातील रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले आहेत, रस्त्यानी नागरिकांना नीट चालता येत नाही, अशी अवस्था अहमदनगर महानगर पालिका अंतर्गत येणाऱ्या अनेक वार्डात अशीच अवस्था आहे

नगरसेवक भाऊ मात्र ज्या ठिकाणी रस्त्याची दुरावस्था झालेली आहे त्या ठिकाणी काम न करता, आपण आणलेले काम कमी पैशात कुठे करता येईल याकडे लक्ष देतांना पाहायला मिळत आहे, पण ज्या ठिकाणी या निधीचा उपयोग झाला पाहिजे त्या ठिकाणी होताना दिसत नाही.

रक्षकच बनला भक्षक; नगरमध्ये मारहाणीत एकाचा मृत्यू ,नातेवाईकांनी केले गंभीर आरोप..
नगर मधील प्रत्येक वार्डात अशीच अवस्था आहे, पण जनतेला सर्व काही समजत आहे, जनता जागरूक आहे, ती आत्ता तुमच्या भीतीपोटी तुम्हाला काय म्हणत नाहीत, तसाच त्रास सहन करत, खड्यात पडत आहे, महिला डोक्यावर गॅस टाक्या घेऊन लांब पर्यंत जात आहेत, शाळेत जाणारी मुले सायकलवरून पडत आहे, कोणाचे हात पाय मोडत आहेत , कोणाला आपला जीव गमवावा लागत आहे, तरी पण या नगरसेवक भाऊंना हे सगळे दिसून सुद्धा आंधळे पणाचे सोंग आणत आहेत.

Table of Contents
पण जनता आत्ता गप्प आहे, पण येणाऱ्या काळात या सर्व त्रासाचा बदला जनता नक्की घेतल्या शिवाय राहणार नाही , त्यावेळी जनता खड्यात नाही पडणार तर हे डोळ्याला पट्ट्टी बांधणारे नगरसेवक या खड्यात पडलेले असतील, त्यामुळे नगरसेवक भाऊंनो आपल्या वार्डात लक्ष द्या जिथे निधीची खरी गरज आहे, त्या ठिकाणी निधी वापरा तुमच्या आणि ठेकेदारांच्या हितासाठी कोणत्याही ठिकाणी निधी टाकू नका.?
नगरसेवक भाऊंनो अजूनही वेळ गेलेली नाही, सकाळी एक तास आपल्या वार्डात जा आणि सामान्य जनतेचे काय प्रश्न आहेत, रस्त्याची काय अवस्था पहा, मोठे खड्डे पडले असतील तर तात्पुरता मुरूम टाकून तो नीट करा, प्रश्न समजून घ्या, तर वाचताल नाही तर हि जनता तुम्हाला खडयात पाडल्या शिवाय राहणार नाही..