काय म्हणाला Shah Rukh Khan ?
सिनेमाचं यश नेमकं कुणाचं?, असा सवाल शाहरूखला करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना शाहरूख म्हणतो… प्रेम (Love) हे जात, धर्म, भाषा, प्रदेश या सर्वांपेक्षा वरचढ आहे हे मांडण्याचा प्रयत्न सिनेमाच्या माध्यमातून करण्यात आलाय. या सिनेमाचं यश हे दुसकं तिसरं कोणाचं नसून तुमचं आहे. तुम्ही सर्व भारतीयांना एकत्र आणण्याचं काम करत आहात, असं शाहरूख म्हणाला. तर, जय हिंद म्हणत त्याने भारतीयांना सॅल्युट देखील केलाय.
दरम्यान, शाहरुख तू एवढा सेक्सी (Sexy) का आहेस?, असा प्रश्न शाहरूखला विचारण्यात आला. त्यावर बोलताना शाहरूखने मजेशीर उत्तर दिलंय.
हा..हा.. काय करणार, आता सवय झाली आहे, प्रामाणिकता फक्त पाहणाऱ्यांच्या नजरेत असतो, असं शाहरूख ट्विटवर म्हणाला आहेत. त्याचे ट्वीट सध्या जोरदार चर्चेत असल्याचं पहायला मिळतंय.