Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
mahalokwani
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
mahalokwani
Home » ब्रेकींग न्यूज » walmik karad | तर मला फाशी द्या; शरणागती पत्करातच वाल्मिक कराडने घातली भावनिक साद..
ब्रेकींग न्यूज

walmik karad | तर मला फाशी द्या; शरणागती पत्करातच वाल्मिक कराडने घातली भावनिक साद..

mahalokwaniBy mahalokwaniDecember 31, 2024Updated:December 31, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध केला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोलले जात आहे. वाल्मिक कराड walmik karad हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे, असा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून केला जात आहे. त्यातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड अखेर सीआयडीला शरण आला आहे. पुण्यात त्याने सीआयडी समोर शरणागती पत्करली आहे. आता सीआयडी त्याची कसून चौकशी करणार असून त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे.

sandhya sonawane| संतोष देशमुख प्रकरणात जामखेड कनेक्शन? राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्याक्ष संध्या सोनवणेची ७ तास सीआयडी चौकशी

walmik karad | तर मला फाशी द्या

वाल्मिक कराडने walmik karad शरणागती पत्करण्यापूर्वी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याने एक मोठा दावा केला आहे. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन 22 दिवस उलटले आहेत. या प्रकरणातही वाल्मिकी कराडचं नाव घेतलं जात आहे. त्याअनुषंगाने आता त्याची चौकशी होणार आहे. वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचे आरोप आहेत. त्यांच्यावर इतरही गंभीर आरोप आहेत. पण खंडणी प्रकरणात तो सीआयडीला हवा होता. त्यामुळे सीआयडीने 9 पथकं तयार केली होती. त्याचा महाराष्ट्रासह कर्नाटकात शोध घेण्यात येत होता.

वाल्मिक कराड हा उज्जैनला गेल्याचंही सांगितलं जात होतं. त्यामुळे पोलीस आणि सीआयडी अलर्ट झाले होते. अखेर आज त्याने स्वत:हून पुणे पोलीस आणि सीआयडीसमोर शरणागती पत्करली आहे. त्यामुळे आता त्याची कसून चौकशी होणार असून तपासातून अधिक माहिती समोर येणार आहे.

Table of Contents

    वाल्मिकवर हत्येचा गुन्हा दाखल करावा
    वाल्मिक कराड walmik karad हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणात वाल्मिक कराडविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याला हत्याकांडातील आरोपी करण्यात यावं, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. त्यामुळे सीआयडी वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करणार का? असा सवाल करण्यात येत आहे.

    वाल्मिकचा व्हिडीओ व्हायरल
    दरम्यान, शरणागती पत्करण्यापूर्वी वाल्मिकीने एक व्हिडीओ शेअर करून आपला संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध नसल्याचा दावा केला आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडीसमोर हजर होत आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी, फाशी द्यावी. राजकीय कारणासाठी माझं नाव घेऊ नये. या प्रकरणात मी जर दोषी असेल तर मला शिक्षा द्यावी, असं वाल्मिक कराडने म्हटलं आहे.

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous Articlesandhya sonawane| संतोष देशमुख प्रकरणात जामखेड कनेक्शन? राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्याक्ष संध्या सोनवणेची ७ तास सीआयडी चौकशी
    Next Article ghodeshwar-sakhare |येरेकर साहेब सर्वांना सारखा न्याय द्या; घोडेस्वार, साखरे यांना त्वरीत निलंबीत करा !
    mahalokwani
    • Website

    Related Posts

    tukda bandi | काय आहे तुकडाबंदी कायद्या 50 लाख नागरिकांना जमिनीची मालकी मिळणार; जाणून घ्या

    July 10, 2025

    nagar-pune | नगरकरांचे स्वप्न पूर्ण होणार; खासदार निलेश लंके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

    July 8, 2025

    Splendor बाईकवर जबरदस्त ऑफर! EMI फक्त ₹2225 पासून!”

    July 4, 2025

    tukda bandi | काय आहे तुकडाबंदी कायद्या 50 लाख नागरिकांना जमिनीची मालकी मिळणार; जाणून घ्या

    nagar-pune | नगरकरांचे स्वप्न पूर्ण होणार; खासदार निलेश लंके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

    Splendor बाईकवर जबरदस्त ऑफर! EMI फक्त ₹2225 पासून!”

    sangram jagtap | अहिल्यानगरमध्ये खळबळ आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी

    coaching classes | डोळ्यात मिरचीची पूड टाकून मुलीवर अत्याचार; नेमकं काय घडलं?

    new car| कार घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार; 10 लाखांपेक्षा स्वस्त कार लवकरच लाँच होणार, जाणून घ्या

    Home | तुमच्या घरात या 5 वस्तू असतील तर बरबाद..! वास्तुशास्त्र काय सांगतं?

    Ahilyanagar| तलाठी आणि कॉलेज तरुणीचा एकत्र मृत्यू: अहिल्यानगर जिल्हा हादरला

    jamkhed | जामखेडमध्ये गोरगरिबांच्या हक्काचं रेशन तहसीलच्या टेबलावर अडकलंय!

    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.