धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून आता नवीन वाद निर्माण झाला आहे. अजित पवार नैतिकतेच्या मुद्दावर तर मुंडे यांनी तब्येतीचे कारण पुढे करत राजीनामा दिल्याचा दावा केला आहे. त्यावरून विरोधक कडाडले आहेत.
mudra loan| मुद्रा लोन प्रत्येकाला मिळणार; दहा लाखापर्यंतचे कर्ज

विष्णू चाटेचा व्हिडिओ कॉल ठेवताच, Walmik Karad Call वाल्मिक कराडने कुणाला के=ला पहिला फोन; सुप्रिया सुळे यांचा तो हादरवणारा आरोप सुप्रिया सुळे यांचा धनंजय मुंडेंवर तो गंभीर आरोप
Walmik Karad Call | वाल्मिक कराडने व्हिडिओ कॉल नेमका कोणाला केला
संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येची फोटो, व्हिडिओ समाज माध्यमांवर येताच एकच खळबळ उडाली. उभा-आडवा महाराष्ट्र पेटून उठला. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या 84 दिवसानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा राजीनामा स्वीकारला. राजीनाम्यावरून आता नवीन वाद निर्माण झाला आहे. अजित पवार नैतिकतेच्या मुद्दावर तर मुंडे यांनी तब्येतीचे कारण पुढे करत राजीनामा दिल्याचा दावा केला आहे. त्यावरून विरोधक कडाडले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक खळबजनक आरोप केला आहे. त्याची आता राज्यात चर्चा होत आहे. धनंजय मुंडे यांच्या अडचणी यामुळे वाढण्याची शक्यता आहे.
राजीनाम्यावरून वाद
यावेळी सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून सरकारला धारेवर धरले आहे. त्यांनी धनंजय मुंडेंचे ट्विट समोर आणले. भुजबळ, अजित पवार म्हणत्यात नैतिकतेवर राजीनामा दिलाय. पण धनंजय मुडे यांनी नैतिकता चा न देखील वापरला नाही. त्यांनी त्यांचे ट्विट प्रसार माध्यमांना दाखवला. त्यांनी स्वतःच्या तब्येतीमुळे राजीनामा दिलाय, असं कारण दिलंय. भुजबळ, आणि अजित पवार म्हणत्यात नैतिकता म्हणून दिलाय. नेमका कश्यामुळे राजीनामा दिलाय, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.
Table of Contents
धनंजय मुंडे यांच्यावर तो गंभीर आरोप
दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी गंभीर आरोप केला. कृष्णा आंधळे गायब होतोच कसा? असा सवाल त्यांनी केला. विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांनी वाल्मिक कराड याला फोन केले आहेत. त्याचा व्हिडिओ कॉल संपल्याबरोबरच वाल्मिक कराड याने धनंजय मुंडे यांना कॉल केले आहेत Walmik Karad Call . धनंजय मुडे आणि वाल्मिक कराड हे संपर्कात होते, असा गंभीर आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.

मला सरकारला विचारायचं आहे तुम्ही म्हणताय नैतिकता म्हणून राजीनामा दिलाय. मात्र ज्याने राजीनामा दिलाय तो म्हणतोय तब्यतीमुळे दिला सुरेश धस म्हणतात ते बरोबर आहे… धनंजय मुडे आणि नैतिकता यांची कधी भेट झाली नाही, अशी टीका खासदार सुळे यांनी केली आहे.Walmik Karad Call ज्या जेलमध्ये आहे, तिथं सीसीटीव्ही नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.