Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
mahalokwani
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
mahalokwani
Home » शिक्षण » birdev done | मेंढर राखणार पोरगा आयपीएस झाला; जाणून घ्या IPS बिरदेव ढोणे चा संघर्षमय खडतर प्रवास
शिक्षण

birdev done | मेंढर राखणार पोरगा आयपीएस झाला; जाणून घ्या IPS बिरदेव ढोणे चा संघर्षमय खडतर प्रवास

mahalokwaniBy mahalokwaniApril 25, 2025Updated:April 25, 2025No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नुकताच युपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेचा निकाल लागला. देशभरातून लाखो मुलांनी सर्वस्व पणाला लावलेल्या या परीक्षेत जेमतेम हजारभर विद्यार्थ्यांनी यशाला कमान घातली. कुणी IAS तर कुणी IPS तर कुणी इतर पदे मेरिटनुसार पटकावली. यातच बिरदेव डोणे birdev 551 व्या क्रमांकाने परीक्षा उत्तीर्ण झाला आणि IPS पदाला त्याने गवसणी घातली.

Gold Rate सोन्याची दमदार उडी, प्रति 10 ग्रॅम किंमत जाणून थक्क

birdev done | मेंढर राखणार पोरगा आयपीएस


ips बिरदेव कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका मेंढपाळाचा मुलगा birdev जात्याच हुशार पण घरची परिस्थिती नाजूक. जळोची गावातील डाॅ राजेंद्र चोपडे यांचा पुतण्या प्रांजल चोपडे हे coep ला दोन वर्षे ज्युनिअर, सिव्हिल इंजिनिअरिंग चा विद्यार्थी.

View this post on Instagram

A post shared by 📍Nagari Bhidu / नगरी भिडू (@nagaribhidu_)

मुले बिरदेव birdev ची चेष्टा करायची. प्रांजल चोपडे यांनी अवतार पाहूनच ओळखले, हा आपल्यापैकी म्हणजे धनगर जातीचा असणार, आणि नाव विचारल्यावर नावावरून खात्रीच झाली. बिरदेव ला ही पुण्यासारख्या ठिकाणी कुणीतरी आपलं भेटलं ह्याचं हायसं वाटलं. सिनिअर्स चा त्रास कमी होण्यासाठी बिरदेव प्रांजल यांना चिकटून राहू लागला. दोघांची चांगली गट्टी झाली. प्रांजल यांनी इंजिनिअरिंग झाल्यानंतर वर्षभर नोकरी केली आणि केंद्रीय स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला.

पुढे बिरदेव ही सिव्हिल इंजिनिअर झाला आणि त्यानेही स्पर्धा परीक्षेच्या मार्गाने जाण्याचे ठरवले. नोकरीच्या मागे न लागता बिरदेव ह्या परीक्षेच्या बेभरवशी आणि खडतर मार्गावरून चालू लागला.या कठीण प्रवासात सीओई पी मध्येच शिकणाऱ्या अक्षय सोलनकर याचीही बिरदेव ला वेळोवेळी सगळ्या प्रकारची मदत झाली.प्रांजल चोपडे हे दोन वर्षांपूर्वी UPSC अंतर्गत फॉरेस्ट ऑफीसर म्हणुन सिलेक्ट झाले. बिरदेव चा यशाचा शोध चालूच होता. तो आज संपला.

आज दुपारी युपीएससी चा निकाल आला. प्रांजल चोपडे यांनी यादीत बिरदेव चे नाव शोधले.
551 व्या क्रमांकावर बिरदेव चे नाव दिसल्यावर बिरदेव ला बातमी देण्यासाठी आणि अभिनंदन करण्यासाठी फोन लावला. तर बिरदेव भर उन्हात मेंढरे चरायला घेउन माळावर गेलेला. तू का मेंढरे घेउन गेलास विचारले असता वडील आजारी असल्याने मीच सध्या मेंढरे घेउन जातोय, बिरदेव उत्तरला. बिरदेव च्या वडिलांचे किडनी च्या मुतखड्याचे ऑपरेशन दोन महिन्यापूर्वी झालेले.

Table of Contents

  • birdev done | मेंढर राखणार पोरगा आयपीएस

पैशाची ओढाताण असल्याने बिरदेव ने प्रशिक्षण चालू असलेल्या प्रांजल आणि दुसरा कोल्हापूर चाच मित्र आशिष पाटील (IAS) या दोघांना मदतीसाठी फोन केला होता. आशिषची कोल्हापूरचा असल्यामुळे त्याच्या ओळखीने तेथील खाजगी मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलला ऑपरेशन ची सोय केली होती. ऑपरेशन झाले पण काहीतरी complication झाले (बिरदेव च्या भाषेत ऑपरेशन बिघडले). तर वडील आजारी असल्याने आमचा हा आय पी एस निकाल लागला त्यादिवशी त्यामुळे मेंढरे घेउन माळावर चारत होता. असा हा बिरदेव चा आय पी एस पर्यंतचा प्रवास.

जाता जाता बिरदेव birdev चा एक किस्सा सांगितला पाहिजे. दुष्काळात तेरावा महिना तसा बिरदेव चा मोबाईल काही दिवसांपूर्वी पुण्यात हरवला. बिरदेव पोलीस तक्रार द्यावी म्हणून पोलिसात गेला. पोलिसांनी तक्रार घ्यायला टाळाटाळ केली. बिरदेव ने प्रशिक्षणाला गेलेल्या मित्रांच्या मदतीने पोलीस तक्रार नोंदवली. तक्रार घ्यायलाच टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांनी तक्रार घेतली पण अजून फोन काही सापडला नाही. बिरदेव अधूनमधून फोन सापडला का विचारायला पोलीस स्टेशनला जात होता, तेव्हा तपास चालू आहे, सापडला की कळवू हे ठराविक साच्याचे उत्तर बिरदेव ला मिळत होते. हाच बिरदेव आज भारतीय पोलीस सेवेच्या सर्वात उच्च पदासाठी निवडला गेला आहे. स्वतः भोगलेल्या हालअपेष्टा आणि उपेक्षा आणि उपसलेले कष्ट यांची जाणीव ठेऊन तो देशसेवा करेल याबाबत मनात तीळमात्र शंका नाही…

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleGold Rate । अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सोन्याची दमदार उडी, जाणून घ्या प्रति 10 ग्रॅम किंमत
Next Article walmik karad | वाल्मिक कराडला तुरुंगात पॅनिक अटॅक ; अर्थरोड तुरुंगात हलवण्याची मागणी
mahalokwani
  • Website

Related Posts

नगरमध्ये JEE -NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑफलाइन क्लासलाच पसंती; ऑनलाईन क्लासेसकडे फिरवली पाठ..!

March 28, 2025

HSRP Number Plate | टू व्हिलर आणि फोर व्हिलर गाडयांना ही नंबर प्लेट बसवा ; नाहीतर भरावा लागेल इतका दंड- जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

March 11, 2025

Budget 2025| राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन या दिवशी होणार; विधानभवनामध्ये बैठक संपन्न..

February 23, 2025

sharad pawar| शरद पवारांकडून पहिल्यांदाच मोदींचे कौतुक, काय म्हणाले शरद शरद पवार

new mobile| नवीन मोबाइलला घेयाचा पण तुमच्याकडे पैसे नाही ; असा मिळवा नवीन मोबाईल

Sindoor वर शरद पवार, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Mahanagarpalika | मोठी बातमी लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजणार; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश

supriya sule | या प्रकरणात पोलिसांवर कारवाई करा, सुप्रिया सुळे यांची मागणी

Ram shinde| पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयात सभागृह इमारतीसाठी १४ कोटी ३२ लाख रूपये मंजूर – सभापती प्रा.राम शिंदे

hsc result 2025 | राज्यात यंदा बारावीच्या’ निकालाची टक्केवारी घसरली; यांनी मारली बाजी

HSC Result 2025| विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार; असा पहा आपला निकाल

rain update | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कोणत्या महिन्यात किती पाऊस पडणार ? वाचा भेंडवळच्या मांडणीतील हवामानाचा अंदाज

© 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.