गरजूंना शिक्षण,आरोग्य व व्यवसाय करण्यासाठी गौतम कलश निधीचे संकलन – परमपूज्य सुनंदाजी म.सा.
जामखेड प्रतिनिधी
गौतम कलश निधीचे संकलन समाजातील शिक्षण, आरोग्य, व्यावसायामध्ये मदत करण्यासाठी भव्य योजना परमपूज्य उपाध्याय श्री प्रविण ऋषीजी म.सा. यांच्या संकल्पनेतून तयार झाले आहे. याचे गावोगावी स्थापना झालेली आहे.
आज रोजी दि.४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७.०० वाजता जामखेड जैन स्थानक येथे परमपूज्य सुनंदाजी म.सा. आदि ठाणा ६ यांच्या पावन सानिध्यामध्ये गौतम निधी फाऊंडेशन ट्रस्ट चे अध्यक्ष संदीप बोगावत व कार्यकारणी यांनी गौतम कलश अनुष्ठान चा कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी परमपूज्य सुनंदाजी म.सा. बोलताना म्हणाल्या की,गौतम निधी कलश अनुष्ठान व संकलन हा कार्यक्रम समाजातील गरजवंत व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी व समाजातील प्रत्येक व्यक्तीने या गौतम कलश निधीमध्ये दररोज परिवारातील प्रत्येक सदस्याने दान समर्पण करायचे आहे. असे आवाहन परमपूज्य सुनंदाजी म.सा यांनी केले.
सकल जैन बांधवांनी सकारात्मक व उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हा कलश नवीन वर्षाच्या सुरुवातीला घरी नेऊन याची स्थापना करावी. श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष दिलीप गुगळे, उपाध्यक्ष महावीर बाफना आदी कार्यकारणी सदस्यांचे या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यासाठी संदीप बोगावत यांनी आभार मानले.
शिक्षण, आरोग्य, व्यवसायात सहकार्य राहील
सामान्य किंवा श्रीमंत कुटुंब असो, लहान मुलांपासून ते वृद्ध सदस्यांपर्यंत, ते गुप्त दान देण्याच्या भावनेने या कलशात पैसे गोळा करतील.जमा केलेली रक्कम समाजातील सदस्यांना शिक्षण आणि आरोग्यासाठी मदत म्हणून आणि व्याजशिवाय व्यवसाय आणि घरांसाठी कर्जाच्या स्वरूपात दिली जाईल.
कलश वर्षातून दोनदा उघडली जाईल
गौतम निधी कलशमध्ये दिलेल्या प्रत्येक कुटुंबाकडून देणगी वर्षातून दोनदा आयोजित कार्यक्रमाद्वारे गौतम स्वामींच्या दारात जमा केली जाईल. कोणत्याही कलशाची रक्कम वैयक्तिकरित्या मोजली जाणार नाही.यातून समाजातील गरजू कुटुंबांना शिक्षण, आरोग्य, विकास आणि घरबांधणीसाठी धनादेशाद्वारे मदत दिली जाणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनिल बाफना, पुनम गुंदेचा, संकेत कोठारी, हिम्मत गांधी,सुमित बोरा, साहिल पितळे,केतन चोपडा, आनंद गुगळे,रणजित सुराणा,सुयोग पितळे आदींनी परिश्रम घेतले.