अहमदनगर :-
विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक असलेल्या डॉ. भास्कर मोरे Bhaskar more याचा सोमवारी दि.१८ रोजी दाखल केलेला जामिन अर्ज जामखेड न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे डॉ. मोरेच्या अडचणी वाढत आहेत.सध्या मोरे हा वन्य प्राणी पाळल्या प्रकरणी वनविभागाच्या कस्टडीत आहे.रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटरचा अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे याच्या विरोधात कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सुमारे ११ दिवस उपोषणास बसले होते. शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग भोसले हे देखील उपोषणास बसले होते.
![](https://mahalokwani.com/wp-content/uploads/2024/03/pandu-aana-1024x768.jpeg)
Bhaskar more प्रकरणात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे मोठे वक्तव्य..
डॉ. मोरे याच्या विरोधात दि.८ मार्च रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संदर्भात गुन्हे अन्वेषण शाखेने दि.१३ रोजी अटक करून जामखेड पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यानुसार जामखेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती.कोठडीची मुदत संपल्याने पुन्हा डॉ. मोरे यास न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर हरीण पाळल्या प्रकरणी डॉ. मोरेला वनविभागाकडुन दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यासंबधात अटक केली होती.वनविभागाची चार दिवसांची दि २० पर्यंत वनकोठडी सुनावली आहे.
सोमवारी दि.१८ रोजी डॉ. मोरे याच्याजामिन अर्जावर मुळ फिर्यादीच्यावतीने अॅड सुमीत बोरा व अॅड अमोल जगताप तसेच सरकारच्यावतीने सरकारी वकील अॅड. संदीप नागरगोजे यांनी बाजु मांडताना न्यायालयासमोर सांगितले की,डॉ. भास्कर मोरे Bhaskar more याने केलेला गुन्हा सामाजिक व्यवस्थेवर अघात करणारा असुन, समाजातील दुर्बल घटकावर अत्याचार करणारा आहे. सदर आरोपी फरार होण्याची दाट शक्यता आहे तसेच सदर आरोपी पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.त्यानंतर न्यायालयाने वरील सर्व बाबींचा विचार करून व फिर्यादीच्या वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन जामखेड न्यायालयाने डॉ. भास्कर मोरेचा जामिन अर्ज फेटाळला.
Table of Contents
मंगळवार दिनांक १९-०३-२०२४ रोजी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात कमिटीची मीटिंग आयोजित केली आहे. या कमिटीमध्ये विद्यर्थ्यांना निमंत्रित केले होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया समजून घेऊन त्या विषयी त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना जिल्हाधिकारी साहेब यांनी दिल्या. यावेळी मुलींनी मोरे Bhaskar more विषयी जे सांगितले ते ऐकून जिल्हाधिकारी पण थक्क झाले. यावेळीउपोषणकर्ते पांडूराजे भोसले, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत, केदार रसाळ , इत्यादी जामखेड मधील अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी वेगवेळ्या विद्यापीठाच्या कमिटीचे सदस्य उपस्थित होते, त्यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांनी केलेल्या इन्स्पेक्शन मध्ये काय काय त्रुटी आहेत हे समजून घेतले, यावेळी असे दिसून आले की, या संस्थने विद्यापीठाची सुद्धा फसवणूक केली आहे हे दिसून आले. तसेच वाजवी पेक्षा जास्त फी विद्यार्थ्यांनाकडून घेतली आहे यावेळी दिसून आले.
या सर्व कमिटीचे म्हणणे एकूण घेतल्यानंतर अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी असे सांगितले की, या संस्थेतील मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची जबाबदारी हि त्या त्या कोर्सच्या विद्यापीठाची आहे. आत्ता विद्यार्थ्यांचे परीक्षेचे दिवस आहे, त्यामुळे त्यांची परीक्षेचे नियोजन करावे. एकाही मुला – मुलीचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याचे नियोजन करावे.
अशा भास्कर मोरे Bhaskar more सारख्या अजून संस्था असतील तर त्याचे पण इन्स्पेक्शन करावे , जेणे करून अशा घटना परत जिल्ह्यात घडायला नकोत अशी सूचना विद्यापीठ कमिटीला अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिल्या.