महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या HSC Result 2025 परीक्षेचा निकाल ५ मे २०२५ रोजी जाहीर करण्याची घोषणा केली आहे. सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद आणि दुपारी १ वाजता ऑनलाइन निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध असेल. विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल mahresult.nic.in आणि इतर अधिकृत वेबसाइटवर पाहता येतील.
Tesla car| टेस्ला कार भारतात या तारखेला दाखल होणार; हे फिचर्स असणार खास

HSC Result 2025| विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली बारावीचा निकाल उद्या
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) इयत्ता बारावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये झालेल्या HSC Result 2025 परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच ५ मे २०२५ रोजी जाहीर करणार आहे. मंडळाने याबाबत आज अधिकृत घोषणा केली आहे. ज्यामुळे लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची धाकधूक वाढली आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल उद्या दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाईन पाहता येणार आहे.

Table of Contents
निकालासाठीची अधिसूचना जारी
यंदा बारावीची परीक्षा दरवर्षीपेक्षा दहा दिवस लवकर घेण्यात आली होती. ही परीक्षा ११ फेब्रुवारी २०२५ ते ११ मार्च २०२५ या कालावधीत सुरळीतपणे पार पडली होती. यावर्षी राज्यभरातून तब्बल १५ लाख विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यानंतर आता नुकतंच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र HSC Result 2025 निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, बोर्डाद्वारे निकालाची तयारी पूर्ण झाली असून, तो उद्या निश्चित वेळेत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला जाईल.