जि.प.प्राथ.शाळा ,धोत्री येथील वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
जामखेड प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे आहे. वार्षिक स्नेह संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव मिळावा, विद्यार्थ्याच्या मनात दडलेल्या सुप्त प्रतिभेला नवे वळण देऊन काहीतरी नावीन्यपूर्ण घडविण्याचा प्रयत्न करावा.शिक्षणाबरोबरच संस्कार ही नितीमुल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचे काम धोत्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक करत आहे.शाळेची वाटचाल ही प्रगती पथावर आहे. असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी व्यक्त केले धोत्री येथे वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी बोलत होते.
Nilesh lanke | आमदार निलेश लंकेची तुतारी नगर दक्षिणेत धमाका करणार..
जामखेड jamkhed तालुक्यातील धोत्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.
दिनांक २३ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ७.०० वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे व मान्यवरांच्या हस्ते करून दिप प्रज्वलन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध नृत्याचे कार्यक्रम सादर केले. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील गाणी, स्वागत नृत्य,धार्मिक, आधुनिक नृत्यप्रकार,बहुभाषिक गीतगायन , देशभक्तीपर गीत, सिनेमागीते, मराठी लोकगीते, नाटिका सादर करून तसेच आपल्या अभिनयातून उपस्थितांची मने विद्यार्थ्यांनी जिंकली.
यावेळी jamkhed गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे विस्तार अधिकारी सुरेश मोहिते,केशव गायकवाड, केंद्रप्रमुख नवनाथ बडे, विक्रम बडे, शिक्षक बँकेचे विश्वस्त मुकुंदराज सातपुते, शिक्षक नेते किसन वराट, एकनाथ चव्हाण,नानासाहेब मोरे ,गोकुळ गायकवाड ,संतोष हापटे ,रामचंद्र गाढवे, मल्हारी पारखे, केशवराज कोल्हे, विजय जाधव, नवनाथ बहीर, शिवाजी हजारे ,बाळासाहेब जरांडे, भगवान समुद्र, मनोजकुमार कांबळे, राम ढवळे, अरुण मुरूमकर ,महेश मोरे, राहुल चव्हाण ,विजय चव्हाण, ज्ञानोबा राठोड ,
प्रवीण पवार ,प्रकाश चव्हाण ,अमोल सातपुते ,प्रशांत कुंभार, विजय जेधे ,सुनील भामुद्रे, अतुल मुंजाळ ,रत्नमाला खूटे निशा कदम, स्वाती सरवदे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष घनश्याम अडाले ,उपाध्यक्ष भाऊसाहेब अडाले ,अविनाश कदम ,संजीवन जाधव, ईश्वर खैरे, विठ्ठल अडाले , शाम सुतार आदी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व धोत्री ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद बीड नागनाथ शिंदे यांनी वार्षिक स्नेहसंमेलनासाठी रुपये पाच हजार रुपये बक्षीस दिले. या वार्षिक स्नेह संमेलनासाठी एकूण 62 हजार 30 रुपये लोक वर्गणी जमा झाली आहे. कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य मुकुंदराज सातपुते व एकनाथ चव्हाण यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती खरपूडे यांनी केले व सूत्रसंचालन मनोज कुमार कांबळे ,विजय जेधे यांनी केले तर आभार अभिमान घोडेस्वार यांनी मानले.