टॉप 2.5 लाख JEE Main रँकर्सनाच संधी; दोन सत्रांमध्ये होणार परीक्षा
JEE Advanced 2026 देण्याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यंदा ही परीक्षा 17 मे 2026 रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षा एका दिवसात दोन सत्रांमध्ये होणार असून दोन्ही पेपर देणे विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असणार आहे.

अधिकृत वेळापत्रकानुसार, पेपर-1 सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत होईल, तर पेपर-2 दुपारी 2:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत घेतला जाणार आहे. एखाद्या उमेदवाराने एक पेपर दिला नाही तर त्याचा निकाल अंतिम मेरिट लिस्टमध्ये समाविष्ट केला जाणार नाही.
दरम्यान, JEE Advanced 2026 साठी अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू होणार असून 2 मे 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे. सर्व अर्ज अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहेत.

पात्रता निकष
या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्याने JEE Main 2026 च्या पेपर-1 मध्ये टॉप 2.5 लाख रँकमध्ये असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराने Physics, Chemistry आणि Mathematics या विषयांसह 2025 किंवा 2026 मध्ये पहिल्यांदाच 12वीची परीक्षा दिलेली असावी. ही परीक्षा जास्तीत जास्त दोन वेळाच देता येते.
अर्ज शुल्क
- महिला उमेदवार : 1600 रुपये
- SC / ST / PwD उमेदवार : 1600 रुपये
- इतर सर्व उमेदवार : 3200 रुपये
परीक्षा पद्धत
JEE Advanced परीक्षा पूर्णपणे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) पद्धतीने घेतली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी ऑनलाइन परीक्षा पद्धतीची तयारी करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध मॉक टेस्टचा सराव करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
अॅडमिट कार्ड
या परीक्षेसाठीचे अॅडमिट कार्ड 11 मे ते 17 मे 2026 दरम्यान डाउनलोड करता येणार आहे. परीक्षा केंद्रावर जाताना प्रिंटेड अॅडमिट कार्ड आणि वैध ओळखपत्र सोबत असणे आवश्यक आहे.
यंदा एक महत्त्वाचा बदल म्हणजे JEE Advanced च्या गुणांच्या आधारे भारतीय विज्ञान संस्था (IISc), बेंगळुरू येथेही प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आणखी एका प्रतिष्ठित संस्थेत शिक्षण घेण्याचा मार्ग खुला झाला आहे.