पत्रकार – शिवशंकर शिंदे
पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे जांभूळवाडीच्या भुतांबरे वस्तीवर दुपारी चारच्या दरम्यान बिबट्या जेरबंद करण्यात आला. नुकतेच खडकवाडी मधील ईश्वरी रोहोकले बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली आहे. जांभुळवाडी येथील भागात देखील धनंजय भूतांबरे वस्तीवर याच बिबट्याने एका मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.
![](https://mahalokwani.com/wp-content/uploads/2025/01/8257235a-ffbe-4345-870f-54c3a5c0539d-1024x576.jpeg)
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नरभक्षक बिबट्या जेरबंद करण्यासाठी पारनेर संगमनेर राहुरी तालुक्यातीलवनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सात तास सर्च ऑपरेशन राबवून जाळीच्या साह्याने बिबट्या जेरबंद करण्यात आला.यात तास येथील वनरक्षक किरण सुभाष साबळे यांना बिबट्याने पंजा मारल्याने किरकोळ जखमी झाले आहेत .
बिबट्याला पकडल्याने खडकवाडी व परिसरातील लोकांनी अखेर सुटकेचा निःश्वास घेतला आहे. जेरबंद बिबट्याला वडगाव सावताळ येथील नर्सरी मध्ये ठेवण्यात आले आहे.यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली होती.
कारवाई मध्ये जिल्हा संरक्षक धर्मवीर साल विठ्ठल .वनरक्षक गणेश मिसाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल राहणे, वनपाल किशोर गांगुर्डे ,सचिन गांगुर्डे, संतोष पारधी, गजानन पवार, संतोष बोऱ्हाडे, वनपाल राजेंद्र रायकर, सचिन शहाणे, रामचंद्र अडागळे यांनी सहभाग घेत बिबट्याला जेरबंद केले .आमदार काशिनाथ दाते सर यांनी सांत्वनपर रोहोकले कुटुंबाची भेट घेतली शासनाकडून १० लाख रुपयांची तातडीने मदत व उर्वरित १५ लाख रुपये असे एकूण २५ लाख रुपयांची मदत कुटुंबाला मिळवून देण्याचे आश्वासन आमदार काशिनाथ दाते kashinath date सर यांनी दिले .बिबट्या जेरबंद होईपर्यंत आमदार काशिनाथ दाते घटनास्थळी उपस्थित होते .