पुढील पाच दिवस राज्यात पाऊस पडणार असल्याचे पंजाबराव डख Panjabrao Dakh यांनी अंदाज वर्तविला आहे . त्यामुळे राज्यात आजही जोरदार पावसाची शक्यता आहे. बारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून संपूर्ण राज्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Panjabrao Dakh| पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज
एप्रिल महिन्याच्या सुरूवातील राज्यातील नागरिक उन्हाच्या तडाख्याने त्रस्त झालेलेल असतानाच पंजाबराव डख Panjabrao Dakh वेगळाच अंदाज वर्तवला आहे. काल राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह वळवाच्या पावसाची हजेरी अनेक भागांत लागल्याने त्रेधातिरपीट उडाली होती. दरम्यान राज्यात आजही जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

पुढील पाच दिवस राज्यात पाऊस पडणार असल्याचे पंजाबराव डख Panjabrao Dakh यांनी म्हटले होते. त्यामुळे राज्यात आजही जोरदार पावसाची शक्यता आहे. बारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून संपूर्ण राज्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Table of Contents
कुठे कुठे पडणार पाऊस ?
राज्याला बुधवारी आणि गुरुवारी देखील अवकाळी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. बुधवारी बारा जिल्ह्यांना ऑरेंज तर अवघ्या राज्याला येलो अलर्ट देण्यात आला. तसेच गुरुवारी देखील यलो अलर्ट देण्यात आला असून शुक्रवारपासून पाऊस कमी होईल, असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.
राज्यातील अनेक भागांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामध्ये पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अमरावती, चंद्रपूरचा समावेश आहे.
पुढील पाच दिवस पावसाचे
राज्यात मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यानंतर काही ठिकाणी दुपारपासून विजेच्या कडकडासह Weather मुसळधार पाऊस कोसळला. याच पार्श्वभूमीवर पुढीस 2 दिवसही महाराष्ट्रात विविध भागांत पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. घाट माथ्यासह शहरात देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवकाळी पावसासाठी अलर्ट रहावे आणि सज्ज रहावे अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत.

जालन्यात पावसाचा रब्बी पिकांना फटका, गहू – मका पीकाचं नुकसान
जालन्यातील घनसांवगी तालुक्यातील शेवगळ आणि परिसरात अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील मक्का आणि गहू पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. घनसावंगी तालुक्यातील शेवगळ आणि परिसरात सकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली आणि या पावसामुळे गहू आणि मक्का पिकाचं मोठ नुकसान झालं. काढणीला आलेला गहू आणि मका पीक अवकाळी पावसामुळे आडवं झालं आहे. दरम्यान या बेमोसमी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला असून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होत आहे. दोन दिवसापासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे कांदा बीज उत्पादक आणि फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.